दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : यावर्षी २६ जानेवारीला ग्रामसभा होणार नाही. या ३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार असल्याची माहिती समोर येतेय. निवडणूक पार पडलेल्या १४२३४ ग्रामपंचायतीत नवीन सदस्यांची सत्ता स्थापन होईपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार उद्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेणार आहे. अनेक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नवी ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत ग्रामसभांना स्थगिती देण्याची सरकारला विनंती केली आहे. 



सध्या १४२३४ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक कारभार पाहत आहेत. एका प्रशासकाकडे ४ ते ५ गावांचा कारभार आहे. त्यामुळे प्रशासक या गावांमध्ये ग्रामसभेला हजर राहू शकत नाहीत.