Jalna News : जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर (chhatrapati sambhaji nagar) एक खाजगी बस पुलाखाली कोसळल्याची घटना घडलीये. यामध्ये 25 प्रवासी जखमी झाले असून चार जण गंभीर जखमी आहेत. पुण्याहून नगरकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Jalna Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलंय. यामध्ये 25 प्रवाशी जखमी झाले असून चार जण गंभीर जखमी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर रात्री 12 वाजेच्या सुमारास बदनापूरजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खाली कोसळल्याची घटना घडली आहे. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस (एम एच 40 सी 6969) पुण्याहून नागपूरकडे जात होती. बदनापूरजवळून जात असताना हा अपघात घडला. या अपघातात बसमधील 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर चार प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.


छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर बदनापूरच्या मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. या घटनेची माहिती मिळताच बदनापूर तसेच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.


 



भंडाऱ्यात भरधाव ट्रकची शिवशाहीला धडक


भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावरील शहापूरजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बसला जोरधार धडक दिली. या अपघातात सुदैवाने सर्व प्रवासी बचावले. मात्र शिवशाही बसच्या समोरील केबिनचा चेंदामेंदा झाला आहे. अपघात घडल्या नंतर सार्वजनिक आदर्श गणेश मंडळच्या कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली होती. या घटनेची नोंद जवाहर नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.