रतन टाटाचं ₹34000000000000 चं महासाम्राज्य कोण सांभाळणार? Tata Group चं 'हे' आहेत दावेदार

Tata Group Future Leaders : रतन टाटा यांना मुलबाळ नसल्यामुळे आता त्यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण असणार अशी चर्चा रंगली आहे. 34 लाख कोटींच्या महासाम्राज्याची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न उपस्थितीत झालाय. 

| Oct 11, 2024, 10:06 AM IST
1/9

भारताचे ज्येष्ठ उद्योगपती आणि उदार व्यक्ती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मोठे यश संपादन केलं. टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय बनवण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा होता. रतन टाटा यांनी 2012 मध्ये वयाच्या 74 व्या वर्षी निवृत्ती घेतली. रतन टाटा 20 वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सामान्य लोक आणि देशाच्या प्रगतीसाठी अनेक महान गोष्टी केल्या. 

2/9

रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आणि भारतासह जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांना मुलं नसल्यामुळे रतन टाटा यांच्या उत्तराधिकारीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सुमारे 34 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याच्या व्यवस्थापनात त्यांची जागा कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. टाटा समूहाच्या सर्व 29 कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप पाहिल्यास, 20 ऑगस्ट 2024 पर्यंत ते $403 अब्ज म्हणजे रु. 33.7 लाख कोटींचं आहे. 

3/9

सध्या एन चंद्रशेखरन हे 2017 पासून टाटा सन्सच्या होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. कुटुंबातील इतर सदस्य व्यवसायाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. भविष्यातील नेतृत्वासाठी संभाव्य उमेदवार असून भविष्यात, ते वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

4/9

जिमी टाटा

जिमी टाटा हे रतन टाटा यांचे भाऊ आहेत. रतन टाटा प्रमाणेच जिमी टाटा हे देखील बॅचलर असून ते नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहतात. 90 च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी जिमी टाटा यांनी टाटाच्या विविध कंपन्यांमध्ये काम केलंय. ते टाटा सन्स आणि इतर टाटा कंपन्यांमध्ये शेअरहोल्डर पैकी एक आहेत.  

5/9

नोएल टाटा

नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ असून ते टाटा समूहाचे प्रमुख दावेदार मानले जातात. नोएल टाटा यांना तीन मुलं आहेत. माया, नेव्हिल आणि लीह टाटा जी समूहाचे संभाव्य उत्तराधिकारी असू शकतात. ते टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत आणि टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये त्यांचा सहभाग पाहिला मिळतो. 

6/9

माया टाटा

34 वर्षीय माया टाटा ही टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बेज बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकमध्ये शिक्षण घेतलेले, त्यांनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. टाटा नवीन ॲप लाँच करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यातून तिची धोरणात्मक कुशाग्रता आणि दूरदृष्टी दर्शवते. (हेसुद्धा वाचा - जमशेदजी टाटा ते रतन टाटा आणि आता 34 वर्षीय माया सांभाळणार TATA समूहाची धुरा? Ratan Tata सोबत खास कनेक्शन)

7/9

नेव्हिल टाटा

32 वर्षीय नेव्हिल टाटा त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात सक्रियपणे गुंतलेले पाहिला मिळतात. टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या मानसी किर्लोस्करशी त्यांचं लग्न झालंय. ते स्टार मार्केटचे प्रमुख असून ट्रेंट लिमिटेड अंतर्गत एक आघाडीची हायपरमार्केट साखळी पाहत आहे. नेव्हिल टाटाकडे टाटा समूहातील भावी नेता म्हणून त्यांची क्षमता अधोरेखित करणारी आहे. 

8/9

लीह टाटा

39 वर्षीय लीह टाटा ही टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मोठी भूमिका बजावतात. तिने आयई बिझनेस स्कूल, स्पेनमधून शिक्षण घेतल्यानंतर ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅलेसेसमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. सध्या ती एका भारतीय हॉटेल कंपनीत कामकाज सांभाळते. 

9/9

रतन टाटा यांच्या निधनानंतरही टाटा समूहाच्या उत्तराधिकाराचा प्रश्न कायम असून नोएल टाटा आणि त्यांची मुलं पायनियर म्हणून उदयास येत असल्याने, टाटा समूहाचे भावी नेतृत्व नाविन्यपूर्ण, सचोटी आणि सामाजिक प्रभावाचा वारसा कायम ठेवण्यासाठी असायला हवं असं उद्योगजगतातील सर्वांचं म्हणं आहे. पुढील प्रवास केवळ कॉर्पोरेट नेतृत्वालाच आकार देईल असे नाही तर भारतातील सर्वात प्रसिद्ध समूहांपैकी एकाच्या भविष्यावरही प्रभाव टाकणारा असणार आहे. त्यामुळे टाटा समूहाची धुरा कोणाकडे जाते हे पाहणं औत्सुकाच असणार आहे.