'आठवतंय का?' म्हणत फडणवीसांना करुन दिली अजित पवारांच्या अटकेच्या विधानाची आठवण; ठाकरेंचाही उल्लेख

Roadside Flex On Pune: पुण्यात झळकलेल्या या फ्लेक्सवर महाविकास आघाडीबरोबर सत्तेत असलेल्या महायुतीमधील नेत्यांच्या विधानांचाही समावेश आहे. नेमकं या फ्लेक्सवर काय म्हटलंय आणि तो कोणी कशासाठी लावलेत पाहूयात...

| Oct 11, 2024, 11:01 AM IST
1/17

sambhajirajechhatrapatiparty

सर्वपक्षीय नेत्यांविरोधात पुण्यात फ्लेक्सबाजी? कोणी लावलेत हे फ्लेक्स? काय आहे या फ्लेक्सवर?

2/17

sambhajirajechhatrapatiparty

उद्धव ठाकरेंचा उल्लेख असलेला फ्लेक्स

3/17

sambhajirajechhatrapatiparty

काँग्रेससंदर्भातील विधानांचा उल्लेख या फ्लेक्सवर आहे. 

4/17

sambhajirajechhatrapatiparty

शरद पवारांनी सोनिया गांधींसंदर्भात केलेल्या उल्लेखांचा संदर्भ फ्लेक्सवर दिसतोय.

5/17

sambhajirajechhatrapatiparty

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा काय म्हणायचे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणतात असा उल्लेख या फ्लेक्सवर आहे.

6/17

sambhajirajechhatrapatiparty

फडणवीसांनी अजित पवारांबद्दल काढलेल्या उद्गारांची फ्लेक्समधून करुन दिली आठवण

7/17

sambhajirajechhatrapatiparty

पुण्यात स्वराज्य पक्षाने आज फ्लेक्सच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं आहे.   

8/17

sambhajirajechhatrapatiparty

पुण्यात स्वराज्य पक्षाकडून महाविकास आघाडी आणि महायुतीच वाभाडे काढणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.  

9/17

sambhajirajechhatrapatiparty

आज स्वराज्य पक्षाचा स्थापना दिवस होत असताना शहरामध्ये ही सत्ताधारी आणि विरोधकांविरुद्ध फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.  

10/17

sambhajirajechhatrapatiparty

'आठवतंय का?' म्हणत सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेसाठी विचारांशी गद्दारी केल्याची उदाहरणांचा उल्लेख फ्लेक्सवर आहे.  

11/17

sambhajirajechhatrapatiparty

अशी फसवणूक नको असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला साथ द्या असंही या फ्लेक्सवर म्हटलं आहे.   

12/17

sambhajirajechhatrapatiparty

राज्यसभेचे माजी खासदार आणि सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य पक्षाला नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. 

13/17

sambhajirajechhatrapatiparty

9 ऑगस्ट 2022 रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे, अशी माहिती संभाजी राजेंनी 1 ऑगस्ट रोजी दिली आहे.   

14/17

sambhajirajechhatrapatiparty

'स्वराज्य' संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल, असं म्हणत संभाजी राजेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन पक्षाची एन्ट्री होत असल्याचं जाहीर केलं.   

15/17

sambhajirajechhatrapatiparty

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे, असं संभाजी राजेंनी म्हटलं आहे.  

16/17

sambhajirajechhatrapatiparty

संभाजी राजेंच्या या स्वराज्य संघटनेनं यापूर्वीच परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी असल्याचं जाहीर केलं आहे. "सोडा परंपरागत पक्षांची भक्ती, आता निवडू परिवर्तन महाशक्ती," असं म्हणत संभाजी राजेंनी काही दिवसांपूर्वीच या तिसऱ्या आघाडीच्या मेळाव्याची क्षणचित्रे शेअर केली होती. संभाजी राजेंबरोबरच प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडूंचा पक्ष या तिसऱ्या आघाडीत सहभागी आहे.

17/17

sambhajirajechhatrapatiparty

आता संभाजी राजेंच्या या आक्रमक पवित्र्याला महाविकास आघाडी आणि महायुती कसं उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.