एटीएम तोडून रोकड चोरी करणार्या चोरट्याला पोलिसांचा इंगा, प्लान हाणून पाडला
चोरी करण्यासाठी चोरट्याची नामी शक्कल, पण हीच शक्कल पडली भारी
मुंबई : पुण्यात एटीएम तोडुन रोकड चोरी करणार्या चोरट्याला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. पुण्यात लोखंडी गजाच्या सहाय्याने एटीएम तोडुन रोकड चोरण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोराला पोलिसांनी शिताफीने अटक केलं आहे.
१९ वर्षीय अजय अरुण कांबळे या चोरट्याला गुन्हे शाखा युनिट 3 पथकाने अटक केलं आहे. पोलीस अंमलदार राकेश टेकावडे यांनी शिताफीने अटक करून त्याचा चोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ही घटना एन.डी.ए रोडवरील शिवणे येथील आय.सी.आय.सी.आय बँकच्या एटीएममध्ये घडली आहे.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये हा तरूण चोर गजाच्या सहाय्याने एटीएम तोडत आहे. एटीएम तोडण्याचा भरपूर प्रयत्न करूनही त्याला ते जमलं नाही. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.