Pune Bypoll Election Results 2023 : निकालाआधी पुण्यात `Who is Dhangekar?` चे लागले बॅनर्स
Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यातील कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. त्याआधीच बॅनर्सबाजी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर?, असे बॅनर्स लागलेत. (Who is Dhangekar?)
Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यात मोठी चूरस पाहायला मिळत आहे. (Pune Bypoll Election Results ) कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर? कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी है" अशा मजकुराचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर? (Who is Dhangekar?) असा सवाल भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीचा प्रचारादरम्यान भरसभेत विचारला होता. त्यालाच उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत. मुळे कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी आहे म्हणत पाटील यांना डिवचण्यात आले आहे.
भाजपचे हेमंत रासने यांच्याविरोधात कसब्यातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून या दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कसबा भाजपच्या हातून जातेय, असे काल विधान केले होते. त्यामुळे या जागेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुण्यातील कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून 20 फेऱ्या होणार आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढत होत असलेल्या दोन्ही जागांवर भाजपाचा विजय होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: कसबा-चिंचवड पोटनिवडणूक निकाल
भाजपने यावेळी ही निवडणूक जाती-धर्मावर केली. पैसे वाटले. काही लोकांना पैसे वाटून बाहेर जायलाही सांगितले. पण कसब्यातले मतदार ठाम होते. त्यांनी रवींद्र धंगेकरांना यांचा 10 हजार मतांनी विजय होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. रवींद्र धंगेकरांचा विजय निश्चित आहे. कसब्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आता कडक इस्त्रीचे कपडे घालणारा आमदार नको. काम करणारा आमदार हवाय. विधानसभेत प्रश्न मांडणारा आमदार हवाय, असे त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रचारात फडणवीसांनी हिंदुत्वासाठी मतदान करा, असे आवाहन केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.