Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे रवीेंद्र धंगेकर विजयी. तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे (Kasba Chinchwad By Election Results)    

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Pune Kasba Chinchwad Bypoll Election Results 2023 Live Updates : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात कसबा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर पाहिला मिळाला असून भाजपला बालेकिल्ल्यातच धक्का बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवीेंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे. 

 

 

2 Mar 2023, 15:11 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणूक,भाजपच्या अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर. अश्विनी जगताप यांना 84388 मतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना 74452 मतं, अपक्ष म्हणून उभे राहिलेले राहुल कलाटे यांनाही 25449 मतं.

2 Mar 2023, 14:26 वाजता

आतापर्यंत भाजपा शिवसेनेच्या पाठिंब्यावर कसब्यामध्ये जिंकत आली. आता दिल्ली आणि फडणवीसांना खरी शिवसेना कुठे आहे हेकळलं असेल असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धंगेकरांच्या विजयानंतर भाजपाला लगावला आहे.

2 Mar 2023, 13:37 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबामध्ये झालेला विजय बोलका असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.  महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. वाढती महागाई , महाराष्ट्रातले निघून चाललेले उद्योग यामुळे जनता त्रस्त झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. कसबा मध्ये आमचा विजय झाला आहे.

2 Mar 2023, 13:35 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय. रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी देऊन आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता. आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री तिथे होते. सर्व गोष्टींचा वापर सत्ताधाऱ्यांनी तिथे केला. तेथील मतदाराने सुद्धा सांगितले की तिथे काय परिस्थिती होती. पण जनतेला आम्हाला कौल दिला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

2 Mar 2023, 12:36 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपाला जागा गमवावी लागली आहे. भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभवानंतर हेमंत रासने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवार म्हणून मी कमी पडलो, पक्षाने मला संधी दिली पण मी कमी पडलो, पराभव मला मान्य असून पराभवाची कारणं शोधणार असल्याचं हेमंत रासने यांनी म्हटलंय.

2 Mar 2023, 12:36 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसब्यात 28 वर्षानंतर भाजपचा पराभव, कॉंग्रेसचे धंगेकर 10950 मतांनी विजयी

 

2 Mar 2023, 12:29 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल 10950 मतांनी विजयी. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं. तर भाजपच्या हेममंत रासने यांना 62 हजार 244 मतांवर समाधान मानावं लागलं. धंगेकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून, फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष.

2 Mar 2023, 12:14 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा मतदार संघात ऐतिहासिक निकाल, कसब्यातून कॉंग्रेसचे धंगेकर 10950 मतांनी विजयी

 

चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
अश्विनी जगताप (भाजप)   52555
नाना काटे (राष्ट्रवादी)  43557
राहुल कलाटे (अपक्ष)  17090

 

कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
हेमंत रासने (भाजप) 62244
रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 73194

2 Mar 2023, 12:01 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. महा विकास आघिडचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल 11 हजार मतांनी विजयी, भाजपाला दाखवला कात्रजचा घाट. कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक निकाल, भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव

2 Mar 2023, 11:50 वाजता

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. महा विकास आघिडचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे मोठी आघाडी. सतराव्या फेरीअखेर धंगेकर यांना 8371 मतांची आघाडी, धंगेकर यांना 60657 मतं.