पुणे : पुण्यामध्ये दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान वाद पाहायला मिळाला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात तलावांवर गणपती विसर्जनासाठीची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने फिरते हौद सुरू केले, पण या फिरत्या हौदावरून मनसे आक्रमक झाली. कचऱ्याच्या कंटेनरचा वापर गणपती विसर्जनासाठी सुरू असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी विसर्जनासाठीचे फिरते हौद बंद पाडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नालायक महापालिकेने कचऱ्याचे कंटेनर देऊन पुणेकरांच्या भावना दुखावल्या. हे तात्काळ बंद केलं नाही, तर सत्ताधाऱ्यांना घरात घुसून मारू. महापौरांनी ज्या मुद्द्यावरुन सत्ता आणली, त्याच हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या. महापौरांनी तत्काळ दख घ्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ', असं मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले.