'नुसता दिखाऊपणा अन् सतत...' हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाचं खरं कारण अखेर आलं समोर

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा (Natasa Stankovic) यांनी जुलै महिन्यात आपण विभक्त होत असल्याची घोषणा केली.   

| Aug 25, 2024, 15:45 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा (Natasa Stankovic) यांनी जुलै महिन्यात आपण विभक्त होत असल्याची घोषणा केली. 

 

1/9

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा (Natasa Stankovic) यांनी जुलै महिन्यात आपण विभक्त होत असल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर दोघांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आपापल्या मार्गाने आता पुढील आयुष्याची वाटचाल करत आहेत. दोघांनीही आपल्या घटस्फोटाच्या कारणांचा उलगडा केलेला नाही.   

2/9

दरम्यान एका रिपोर्टनुसार, नताशाला हार्दिकसह राहणं कठीण झालं होतं. तो पूर्णपणे स्वत:बद्दल विचार करत स्वार्थी झाला असल्याने नताशाला असह्य झालं होतं. तिने त्याच्या व्यक्तिमत्वाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सततच्या प्रयत्नांनी ती थकली होती.   

3/9

"तो तिच्यासाठी खूप दिखाऊ होता. तो स्वतःने भरलेला होता. नताशा आता ते हाताळू शकत नव्हती. तिला जाणवलं की, आपण दोघे व्यक्ती म्हणून फार वेगळे आहोत. तिने त्याच्याशी जुळवण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं,"  असं वृत्त टाइम्स नाऊने सूत्राच्या हवाल्याने दिलं आहे.   

4/9

"ही एक कधीही न संपणारी प्रक्रिया होती. त्यामुळे नताशी काही काळाने थकली होती. तिला ती गती ठेवता आली नाही म्हणून तिने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला, ” असं वृत्त टाइम्स नाऊने सूत्राच्या हवाल्याने दिलं आहे"  

5/9

"तिने यावर विचार केला पण जेव्हा हार्दिकमध्ये काहीही बदल होत नसल्याचं लक्षात आलं तेव्हा तिने तिचा निर्णय पक्का केला"  

6/9

नताशाने घेतलेला निर्णय फार वेदनादायी होता, पण तो एका दिवसात/एका आठवड्यात घेण्यात आलेला नाही. ती एक हळूवार झालेली जखम तिला सतत दुखत होती," असं सूत्राने सांगितलं.  

7/9

दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यापासून मुलगा अगस्त्य सर्बियामध्ये आईच्या घरी गेला आहे, जिथे दोघे सध्या राहतात. दरम्यान, हार्दिक गायिका जास्मिन वालियाला डेट करत असल्याची चर्चा आहे.  

8/9

एलेना टुटेजा आणि हार्दिक पांड्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या सर्व अफवांना एलेना टुटेजानेच ब्रेक लावला आहे.   

9/9

वेस्ट इंडिजचे महान खेळाडू ब्रायन लारा यांना भेटल्याचे फोटो तिनं शेअर केले आहेत. तुम्हाला हे फोटो देखील फोटोशॉप वाटू शकतात.  मात्र, हे फोटो असो की हार्दिक पांड्या सोबतचे फोटो फोटोशॉप नाहीत ते खरे आहेत.सर्व फोटो खरे असून कुणालाही डेट करत नाही, लोकप्रिय लोकांसोबत काम करु लागलीय, असं एलेना टुटेजानं म्हटलं.