10 वर्षात 9 फ्लॉप चित्रपट, सुपरहिट डेब्यूनंतर बुडू लागलं करिअर; अखेर खाकी वर्दीने दिलं जीवनदान

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. यामधील त्याचा अभिनय खूप आवडला. त्यानंतर त्याने अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर त्यांची कारकीर्द बुडाली. मात्र, खाकी वर्दीने त्याच्या कारकीर्दीला नवी दिशा मिळाली. 

| Aug 25, 2024, 15:15 PM IST
1/6

नेहमी चर्चेत

सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळेच तो आज आपल्या कारकीर्दीत उच्च पदावर आहे. लक्झरी जीवन जगण्यासाठीही हा अभिनेता चर्चेत असतो. 

2/6

चाहत्यांची मने जिंकली

प्राइम व्हिडीओच्या ओटीटी सीरीज 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत सिद्धार्थने लोकांची मने जिंकली. यानंतर त्यांनी 'योद्धा' चित्रपटातून सर्वांची मने जिंकली होती. 

3/6

फ्लॉप चित्रपट

सिद्धार्थ मल्होत्राने 10 वर्षांच्या करिअरमध्ये 9 पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले आहे.पहिल्या चित्रपटानंतरच त्याचे करिअर बुडण्याच्या मार्गावर होते. 

4/6

15 हून अधिक चित्रपट

पहिल्या चित्रपटानंतर त्याला काम मिळाले. मात्र, सिद्धार्थचा एकही चित्रपट मोठे यश मिळवू शकला नाही. 12 वर्षांच्या कारकीर्दीत त्याने 15 हून अधिक चित्रपट केले आहेत.   

5/6

पोलीस अधिकारी

सिद्धार्थने खाकी वर्दीमधून अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये शेरशाह, योद्धा आणि रोहित शेट्टीच्या इंडिनय पोलीस फोर्स या वेबसिरीजमध्ये तो पोलीस अधिकारी म्हणून दिसला होता. 

6/6

75 कोटी संपत्ती

रिपोर्टनुसार, सिद्धार्थ 75 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीचा मालक आहे. त्याची महिन्याला 50 लाखांपेक्षा जास्त कमाई आहे. त्याला बाईक आणि लक्झरी कारचा शौक आहे.