The Ultimate JATT...! शिखर धवनच्या निवृत्तीवर 'हिटमॅन' रोहितची खास पोस्ट, म्हणाला...

Rohit Sharma On Shikhar Dhawan : टीम इंडियाचा गब्बर असलेल्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शिखरने व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. 

| Aug 25, 2024, 15:58 PM IST
1/5

रोहित आणि शिखर

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची सलामीची जोडी सर्वात प्रचलित जोडी म्हणून समोर आली. या दोघांनी टीम इंडियासाठी अनेक सामने खेळले अन् जिंकवले सुद्धा..!

2/5

शिखरसाठी खास पोस्ट

निवृत्तीनंतर आता क्रिडाविश्वातून शिखरला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा मिळत आहेत. अशातच आता टीम इंडियाच्या कॅप्टनने म्हणजेच रोहितने देखील शिखरसाठी खास पोस्ट लिहिली.

3/5

आठवणी

रूम शेअर करण्यापासून ते मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी निर्माण करण्यापर्यंतच्या आठवणी आयुष्यभरासाठी आहेत, असं रोहितने म्हटलंय.

4/5

द अल्टीमेट जट

द अल्टीमेट जट, शिखरने नेहमी दुसऱ्या एन्डपासून माझं काम सोपं केलं, असं रोहित शर्माने पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. रोहितने शिखरसोबतचे फोटो देखील शेअर केले.

5/5

थँक्यू ब्रो

शिखरने देखील 'थँक्यू ब्रो' म्हणत रोहितची पोस्ट रिपोस्ट केली अन् आभार मानले. क्रिकेटच्या मैदानाबाहेर रोहित आणि शिखर खास मैत्र देखील आहेत.