Pune Crime: लैंगिक अत्याचार त्यावर पुरुषी अहंकार! तरुणीने तक्रार केली म्हणून `तसले` व्हिडीओ व्हायरल
Pune Crime: पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय होता. दरम्यान आपला वाढदिवस असल्याचे निमित्त साधून अर्जुनने पीडित तरुणीला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
Pune Crime: कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचाराच्या घटनेत पीडित पोलीस स्थानकाची पायरी चढतात. येथे आपल्याला न्याय मिळेल याची त्यांना खात्री असते. पण पोलीस स्थानकात न्याय मागायला गेली म्हणून तरुणीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. अर्जुन मुंडे असे या तरुणाचे नाव आहे.
पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय होता. दरम्यान आपला वाढदिवस असल्याचे निमित्त साधून अर्जुनने पीडित तरुणीला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने तरुणीचे अश्लील व्हिडीओ देखील काढले होते. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती.
यानंतर फिर्यादी तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यावेळी आरोपीने आपल्यासोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तरुणीने म्हटले आहे.
मित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी
यानंतर हा प्रकार इथेच थांबला नाही तर याला आणखी धक्कादायक वळण आले. आपल्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग अर्जुनच्या मनात होता. यामुळे त्याचा पुरुषी अहंकार दुखावला होता. पोलीस तक्रार केली म्हणून तरुणीचा त्याला बदला घ्यायचा होता. त्याने तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो तिच्या आई आणि नातेवाईकांना व्हाट्सअपवर पाठवले.
फोटो पाठवून तो शांत बसला नाही. तर पीडित मुलीला ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे या 32 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंदुकीचा धाक दाखवत पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीवर बलात्कार
दरम्यान पुण्यातूनच आणखी एक घटना समोर आली आहे. यात नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणार्या तरुणीवर बंदूकीच्या धाकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी, राहुल चंद्रकांत यादव (वय.32,रा. सोना अपार्टमेंट औंध रोड) याच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 24 जुन 2023 रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास बाणेर येथील एका हॉटेलवर ही घटना घडली असल्याची तक्रार ३० वर्षीय तरुणीने दिली आहे. लग्न जमवणाऱ्या एका संकेतस्थळावरुन पिडीत तरुणीची आरोपीसोबत ओळख झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आयटी कंपनीत नोकरी करते. ती अविवाहीत असून तिने आपला बायोडेटा एका या संकेतस्थळावर टाकला होता. आरोपी राहुल याने तेथून तरुणीसोबत संपर्क केला. त्याने तरुणीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून दोघे बालेवाडी परिसरात भेटले. तरुणीचा राहुल याच्यावर विश्वास निर्माण झाला. पुढे फोनवर बोलण्याबरोबरच घरी जाणे येणे सुरु होते. 24 जुन रोजी राहुल हा तरुणीला बाणेर येथील एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे त्याने बंदूकीच्या धाकाने तरुणीवर बलात्कार केला, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.