UP Student Sucide: सोळावं वरीस धोक्याचं असं म्हणतात. कारण सोळा वर्षे पूर्ण होऊन सतराव लागत असताना मुलं हळुहळू वयात येत असतात. त्यावेळी त्यांच्यात शारीरिक, मानसिक असे अनेक बदल होत असतात. अशावेळी ते कोणत्या गोष्टी मनाला लावून घेतील, हे सांगता येत नाही. याकडे पालकांचे थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास अनर्थ घडायला वेळ लागत नाही. अशीच एक दुर्घटना नुकतीच समोर आली आहे. ज्यामध्ये अकरावीच्या विद्यार्थ्याने क्षुल्लक कारणावरुन बिल्डिंगमधून उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.
गाझियाबादच्या उच्चभ्र सोसायटीत ही घटना घडली. येथे राहणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
ही घटना घडली त्यावेळी विद्यार्थ्याचे आई आणि बहीण दोघीही घराबाहेर होत्या. घरी कोणी नाही हे हेरुन विद्यार्थ्याने हे टोकाचं पाऊल उचलंल. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांना कोणतीही कारवाई नको असल्याचे सांगितले. गाझियाबादच्या इंदिरापुरम भागातील अहिंसा विभागाच्या एका सोसायटीत ही घटना घडल्याची माहिती देण्यात आली.
बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आई-मुलगी कुत्र्याला फिरवण्यासाठी सोसायटीत उतरल्या होत्या. त्यावेळी फ्लॅटमध्ये 17 वर्षीय विद्यार्थी एकटाच होता. यादरम्यान तो बाल्कनीतून खाली पडल्याचा आवाज आला. आवाज ऐकून सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले. जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या विद्यार्थ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस सोसायटीत पोहोचले. त्यांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई नको असल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मित्रांशी झालेल्या वादातून हे टोकाचे पाऊलं उचलले गेल्याचे सांगितले जात आहे.
मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन सुन्न करणारी घटना
जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलामध्ये काही असामान्य वर्तन दिसेल तेव्हा त्याकडे लक्ष द्या. आत्महत्येचा निर्णय तात्काळ घेतला जातो पण त्याची मानसिकता आधीच तयार केली जाते. विशेषत: टीनएजमध्ये मुलांसमोर विविध प्रकारचे प्रश्न उभे राहतात, त्यामुळे पालकांनी अशा वेळी सतर्क राहणे आवश्यक आहे. मुलांच्या वागण्यात काही बदल होत असेल तर ते समजून घेऊन समजावून सांगण्याची गरज आहे. मुलांचे वागणे समजत नाही, तेव्हा अशा घटना समोर येतात, असेही मनोचिकित्सक सांगतात.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात अघोरी उपचार, पालघरमध्ये धक्कादायक प्रकार