Pune Physical Abused News : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील (Pune Crime News) गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे. काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत असल्याने पोलीस प्रशासनावर (Pune News) प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरात एका 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Physical Abused) झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या कोथरूड (Kothrud) भागात खाऊ देण्याच्या बहाण्यानं 30 वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीवर अत्याचार केला. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा छडा लावत एका व्यक्तीस अटक केली आहे. राजेश चोरगे असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे. पिडितेच्या आजोबांनी कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या घरासमोर राहतात. शनिवारी फिर्यादी आजोबांची नात घराजवळ खेळत होती. ही मुलगी केवळ 4 वर्षांची आहे. यावेळी आरोपी चोरगे त्या ठिकाणी आला आणि त्याने तिला खाऊच्या बहाण्याने मुलीला जवळ असलेल्या शंतीबन चौकाजवळ घेऊन गेला. त्याठिकाणी उभ्या असलेल्या बसच्या खाली नेऊन या नराधमाने त्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. चिमुकलीने आरडाओरडा केल्यामुळे जवळ असलेल्या लोकांनी हे कृत्य पाहिलं आणि त्या चिमुरडीला बसच्या खालून बाहेर काढलं.


आणखी वाचा - 5 दिवसांच्या लेकीसह आईने असे भयानक कृत्य केले की शेजाऱ्यांचा थरकाप उडाला; पोलिसही चक्रावले


दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पुण्यात नेमकं काय चाललंय? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणत सुरु असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं होतं. तर खुन आणि मारामारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे