Pune Crime : पुण्याच्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या बुधवार पेठेतील क्रांती चौकात वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपीने तिथून पळ काढून राज्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली. फरासखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नईम शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली. पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख हा महिलेचा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी या महिलेने हत्या झालेल्या नईम शेखसोबत विवाह केला होता. त्यानंतर ते दोघेजण एकत्र राहत राहू लागले. मात्र पत्नीने दुसरा विवाह केल्याचे कळताच कलाम नईमवर चिढला होता. त्याने नईमचा काटा काढण्याचे ठरवलं होतं.


कलामने नईमवर लक्ष ठेवण्यात सुरुवात केली होती. शुक्रवारी संध्याकाळी बुधवारी पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ कलाम थांबला होता. काही वेळाने नईम तिथे आला. तितक्यात कलामने खिशातला वस्तरा काढला आणि नईमच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात नईम गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच नईमचा मृत्यू झाला होता.


दरम्यान, या सगळ्या प्रकारनंतर कलाम तिथून पसार झाला. कलाम त्याच्या मित्रासोबत पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून कलामला त्याच्या मित्रासह रात्री उशीरा ताब्यात घेतले.


धाराशिवमध्ये मोबाईल चोरल्याचा संशयावरून तरुणाला बेदम मारहाण


धाराशिवमध्ये एखाद्या जनावराला मारावे अशी बेदम मारहाण एका तरुणाला करण्यात आली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरून या तरुणाला अंगावरील कपडे काढून ऊसाने व लाट्या काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमर राजेंद्र लोमटे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची नाव आहे. याप्रकरनी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या चार तासात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अक्षय दत्ता इंगळे, संतोष दादाराव वाघमारे, अकबर शेख व शंकर चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


ढोकी येथील तेरणा साखर कारखाना परिसरात ही घटना घडली आहे. ढोकी साखर कारखान्यांच्या रस्त्यावरून अमर हा पहाटे चार वाजता घराकडे चालला होता. त्यावेळी चौघ जणांनी त्याला हटकलं आणि तू आमचा मोबाईल चोरला असं म्हणत मारहाण करायला सुरुवात केली. या चौघांनी अमरला उसाने व लाठ्या काट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावर पाणी आणि मीठ टाकले. त्यावेळी हा गोंधळ पाहून एक ट्रॅक्टर चालक त्या ठिकाणी आला व त्याने अमरला त्यांच्या तावडीतून सोडवून घरी आणले. जखमी झालेल्या अमरला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना अमरचा मृत्यू झा