आत्मघातकी हल्ल्याच्या संशयाने पुण्यात तरूणीची चौकशी
याबाबत काश्मिरच्या सुरक्षा यंत्रणांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 18 वर्षांची ही तरूणी येरवडा भागात राहणारी असल्याचं सांगण्यात येतंय.
पुणे : पुण्यामधली एक तरूणी काश्मिरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान आत्मघातकी हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत काश्मिरच्या सुरक्षा यंत्रणांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 18 वर्षांची ही तरूणी येरवडा भागात राहणारी असल्याचं सांगण्यात येतंय.
आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात
पुणे पोलिसांकडे याबाबतची फार काही माहिती नसल्याचं समजतंय. २०१५मध्ये पुणे एटीएसनं एका तरुणीला आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. ती अल्पवयीन असल्यांनं तिचं मनपरिवर्तन घडवण्यात आलं.
ही तीच मुलगी असण्याची शक्यता
आताची संशयित तरुणी ही तीच मुलगी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीये. पुणे पोलिसांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता ती शिक्षणासाठी अज्ञात स्थळी गेल्याचं तिचा पालकांनी सांगितलंय. तिचे पालक याविषयी अधिक काही बोलायला तयार नसल्याचं पोलिस सुत्रांनी सांगितलं आहे.