MHADA lottery 2024 : जीवनातील कैक वर्षे ठराविक चौरस फुटांमध्ये आयुष्य व्यतीत केल्यानंतर प्रत्येकाला स्वत:ची जागा मिळेल असं प्रशस्त घर असावं हे स्वप्न अनेकजण पाहतात. या स्वप्नाचा पाठलाग करत मग, प्रयत्न सुरू होतात ते म्हणजे योग्य घराचा शोध घेण्याचे. घर हवं आणि तेसुद्धा प्रशस्त, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या सर्वांसाठी म्हाडानं एक कमाल गृहयोजना आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर ही योजना काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली, पण आता मात्र त्यासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांना मुदतवाढ देत MHADA नं दिलासा दिला आहे. म्हाडाच्या पुणे बोर्डासाठी ही नवी सूचना जारी करण्यात आली असून, त्यानुसार आता खिशाला परवडणाऱ्या 6294 घरांसाठीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 


योजना जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 असेल असं जाहीर करण्यात आलं होतं. पण, नव्या नियमावलीनुसार आता अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असेल, 10 डिसेंबर 2024. म्हाडाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकामध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक विचारात घेत ही नवी तारीख निश्चित करण्यात आल्याचं कारण म्हाडाच्या वतीनं पुढे करण्यात आलं. दरम्यान, 10 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असून, सोडतीतील विजेत्यांची नावं 7 जानेवारी 2025 रोजी जाहीर केली जाणार आहेत. 


कोणत्या परिसरातील घरांचा सोडतीमध्ये समावेश? 


म्हाडाच्या पुणे मंडळाअंतर्गत तब्बल 6294 घरांचा समावेश सोडत प्रक्रियेत करण्यात आला आहे. याअंतर्गत पिंपरी चिंचवड, पुणे इथं खरं उपलब्ध असतील. त्याशिवाय सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही विविध योजनांअंतर्गत येणारी घरं म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील घरांचाही या योजनेत समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. 


हेसुद्धा वाचा : Watch Video : म्हातारीचा बूट पाहिलात, पण त्यात राहणारी म्हातारी कधी पाहिलीये? 


10 लाख रुपयांपासून 1 कोटींहून अधिक रकमेपर्यंत या घरांचे दर निश्चित करम्यात आले आहेत. यामध्ये 6294 घरांपैकी 2340 घरं प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्त्वावर उपलब्ध आहेत. तर, 418 घरं PMAY (पीएम आवास) योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या त्तत्वावर उपलब्ध करून दिली जातील. 


म्हाडाच्या कोकण मंडळाकडूनही मुंबई एमएमआर आणि रायगड जिल्ह्यामध्ये 12,626 घरांची सोडत जारी करण्यात आली आहे. जिथं 20 लाखांपासून 1 कोटी रुपयांच्या दरांमध्ये घरं सामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. यामध्ये 100 प्लॉटचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.