पुणे : खंडाळ्याच्या घाटात मालगाडीचे डबे घसरल्यावर पूर्णपणे ठप्प झालेली वाहतूक आता हळूहळू सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रगती एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन आजही रद्द करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडाळा घाटातली तीन पैकी रेल्वे मार्गांपैकी मधला रेल्वे मार्ग सुरू करण्यात प्रशासनाला यश आलंय.. आज पुण्याहून मुंबईला प्रगती आणि डेक्कन क्वीन आजही रद्द करण्यात आल्या आहेत. तर सिंहगड एक्स्प्रेस रवाना करण्यात आली.  तीन पैकी दोन मार्ग सुरू झाल्यानं आता पूर्णपणे ठप्प असलेली वाहतूक काही प्रमाणात सुरु होईल, अशी आशा आहे. 


काल दुपारी खंडाळ्याच्या घाटात मंकीहिल सेक्शनमध्ये मालगाडीचे दोन डबे घसरले. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली होती. आता हळूहळू  ही वाहतूक सुरू होत आहे. 


दरम्यान कालापासून पुण्याहून मुंबई कडे आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेनं एकूण ४४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर १५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.