पुणे: आजकाल आपल्याला सर्वांनाच मांजर (Cats) पाळायची हौस आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात तुम्हाला चार-पाच मांजरी पाळलेल्या दिसतील. कारण सगळीकडेच हल्ली वेगवेगळ्या जातीच्या महागड्या मांजरी (Expensive Cats) पाळल्या जातात. आजकाल लोकांची हौस इतकी असते की ते मांजरींना योग्य नट्टाफट्टा करत महागडे ड्रेसेही घालतात. तर त्यातूनही त्यांचे (Cats Funny Videos on Social Media) सोशल मीडियावर अकांऊट टाकतात आणि त्यांचे फोटोज आणि व्हिडीओही (Viral Videos) टाकत असतात. त्यामुळे सध्या पेन्ट्सच्या नावाखाली सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होत असतात. परंतु आता मांजर प्रेमींसाठी (Cats Viral Videos) ही एक महत्त्वाची बातमी आली आहे. जाणून घेऊया या बातमीबद्दल. (Pune Municipal Corporation required license now for cat pet parenting)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांजर पाळायची असेल तर आता परवाना (License) आवश्यक करण्यात आलाय. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय जारी केला आहे. प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाईल. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार कुत्रा, घोडे (Dogs) अशा पाळीव प्राण्यांसाठी परवाना घ्यावा लागत होता. आता मांजरींसाठीही हा परवाना लागू करण्यात आला आहे. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


कुत्रे, घोडे, (Hourse) मांजर अशा पाळीव प्राण्यांसाठी आता तुम्हाला महानगरपालिकेकडे (Municipal Corporation) नोंदणी करून परवाना घेणे आवश्यक तसेच बंधनकारक राहणार आहे. सध्या शहरात घोडे आणि कुत्र्यांपेक्षा मांजरी पाळण्याचीच संख्या जास्त आहे. समोर आलेल्या काही माहितीनुसार, लाखांच्या आता पाळीव कुत्रे आहेत तर घोड्यांची संख्याही हजारांच्या आसपास आहे. सध्या मांजर पाळण्याची परंपरा सुरू झाली असून नागरिकांमध्ये (Citizens) याबाबत एक वेगळीच मानसिकता निर्माण झाली आहे तर अनेकांना आपल्या प्राण्याची देखभाल कशी करायची, आपले आणि प्राण्याचे आरोग्य कसे राखायचे याची फारशी जाणीवही नसते. 


तर दुसरीकडे पाळीव प्राण्यांबाबत जनजागृतीही वाढत आहे. त्यातून अनेक शेजारच्या घरात मांजरी आल्या की आपल्यालाही त्रास होतो. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेचा (Pet Parenting) मुद्दा येतो ज्यावर पाळीव प्राणी पाळणाऱ्यांनीही खबरदारी घेणं आवश्यक आहे. याच्या बऱ्याच तक्रारीही महानगरपलिकेकडे येत असतात. 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


काय आवश्यक आहे नोंदणीसाठी ? 


  • मांजरींच्या नोंदणीसाठी वार्षिक 50 रूपये आवश्यक 

  • नोंदणीसाठी रहिवासी पुरावा, ॲटीरेबीज (Anti Rebies) लसीकरण (Vaccination) प्रमाणपत्र, तुमच्या मांजरीचा फोटो आवश्यक. 

  • त्यासोबतच 50 रूपयांच्या नोंदणीशुल्कासोबत 25 रूपये शुल्क द्यावे लागेल. 

  • ही सर्व प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करायची आहे.