Pune CCTV Video: गेल्या काही दिवसात पुण्यातील अतिक्रमण विभाग (Encroachment Department) खडबडून जागं झाल्याचं पहायला मिळत आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या (FC Road) रस्त्यावर प्रामुख्याने नजर ठेवली जाते. अशातच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांची मुजोरी पाहायला मिळाली आहे. अतिक्रमण विभाग कारवाई करत असताना उपायुक्त माधव जगताप यांचा (Madhav Jagtap) पारा चढला. कारवाई करत असताना खाद्य पदार्थांचे स्टॉलवर लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर लाथ मारून खाद्यपदार्थ उडवून लावल्याचा व्हिडीओ (CCTV Video) समोर आला आहे. हा कारवाईचा व्हिडीओ मागील महिन्यातील असल्याची माहिती देखील समोर आलीये. पाच एप्रिल रोजी ही घटना घडल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर समजतंय. सीसीटीव्ही फुजेट समोर आल्याने महापालिका उपायुक्तांच्या (Encroachment Deputy Commissioner) अडचणीत वाढ झाली आहे. 


आणखी वाचा -पुणे डीआरडीओ हनी ट्रॅप प्रकरण : प्रदीप कुरुलकर याची होणार पोलिग्राफ टेस्ट


व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकाराची महापालिका आयुक्तांकडे (Pune Municipal Commissioner) तक्रार करण्यात आली असून माधव जगताप (Madhav Jagtap) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील ट्विट करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.


काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?


पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सुप्रिया सुळे (Supriya Sule On Madhav Jagtap) यांनी केली आहे.


पाहा Video 



दरम्यान, हा अधिकारी आहे की गुंड? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. ताळतंत्र सोडत गुंडासारखे सगळे स्टॅाल लाथेने उडवून लावलेत, असं म्हणत नेटकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत.