पुणे डीआरडीओ हनी ट्रॅप प्रकरण : प्रदीप कुरुलकर याची होणार पोलिग्राफ टेस्ट !

 DRDO honey trap case : डीरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरची आता पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. कुरुलकरच्या एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो आढळलेत. कुरुलकर एक दोन नाही तर तब्बल चार फोन वापरत होता. तेव्हा इतर फोन ताब्यात घेण्यासाठीही एटीएसने परवानगी मागितली आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 16, 2023, 11:49 AM IST
पुणे डीआरडीओ हनी ट्रॅप प्रकरण : प्रदीप कुरुलकर याची होणार पोलिग्राफ टेस्ट ! title=

Pune DRDO honey trap case :  पाकिस्तान हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेला डीरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरची आता पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. जर पॉलिग्राफ टेस्टमध्येही कुरुलकरने तोंड उघडलं नाही तर नार्को टेस्ट घेण्याची तयारीसुद्धा एटीएसने केली आहे. कुरुलकरच्या एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो आढळलेत. तर याच मोबाईलमध्ये संरक्षण दलाची चित्रं, कागदपत्र, व्हिडिओ, ऑडिओसुद्धा होते. दुसऱ्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी एजंट झारासोबतचं व्हॉट्स अ‍ॅप चॅट आणि पर्सनल व्हिडिओही आढळला आहे. कुरुलकर एक दोन नाही तर तब्बल चार फोन वापरत होता. तेव्हा इतर फोन ताब्यात घेण्यासाठीही एटीएसने परवानगी मागितली आहे.

संरक्षण दलाची महत्त्वाची माहिती दिल्याची बाब उघड

 पाकिस्तानच्या हनीट्रॅप जाळ्यात अडकून डीरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याने संरक्षण दलाची महत्त्वाची माहिती दिल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी त्याला एटीएसने अटक केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून कुरुलकर एटीएस कोठडीत आहे. संरक्षण दलाची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंट यांना पुरविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महासंचालकांच्या परवानगीने एटीएसकडे गुन्हा दाखल केला होता.

 कुरुलकर याच्याकडून तपास यंत्रणेची दिशाभूल

कुरुलकर याच्याकडून खळबळजनक माहिती समोर आली. तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुलकर अनेक माहिती लपवून तपास यंत्रणेची दिशाभूल करीत आहे. एका कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे कुरुलकर तोंड उघडत नाही. पुरावे आणि माहिती मिळूनही त्याची कबुली देत नसल्याने त्याची पोलिग्राफ टेस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्याची परवानगीही देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एक नव्हे, तर चार चार मोबाईलचा वापर

 कुरुलकर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक नव्हे, तर चार चार मोबाईल वापरत होता. त्याच्या मोबाइलमध्ये महिलांचे फोटो आहेत. पाकिस्तानी एजंट असलेल्या झारादास गुप्ता याने 'झारा' या टोपण नावाने अनेकदा संवाद केला. तपास अधिकार्‍यांनी या नंबरबाबत गूगल आणि इंस्टाग्राम यांच्याकडून अहवालही घेतला असून, तो नंबर पाकिस्तानचाच असल्याचे उघड झाले आहे. तसेच त्या क्रमांकाचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानचा असल्याचे सिद्ध झाले आहे.

एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील फोटोज तर दुसर्‍या मोबाईलमध्ये..

तसेच कुरुलकर वापरत असलेल्या एका मोबाईलमध्ये संरक्षण दलाचे फोटो, डॉक्युमेंट्स, व्हिडिओ, ऑडिओ, इन्स्टंट मॅसेजेस, महिलांचे अश्लील फोटोज तर दुसर्‍या मोबाईलमध्ये पाकिस्तानी एजंट झारा हिच्या नावाचा व्हॉट्सअप चॅटिंग आणि पर्सनल व्हिडिओ आढळून आले आहेत.