Pune School Van Drivers: बदलापूरमधील एका शाळेत 2 मुलींच लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यानंतर बदलापूरकरांनी 10 तास रेल रोको केला. आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरा अनिवार्य केला. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. या घटनेनंतर मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. असे असताना शिक्षणाच माहेरघर असलेल्या पुण्यातून संतापजनक प्रकार समोर आलाय.


'तू मला आवडतेस'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात शाळकरी मुलींसोबत छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून होतेय. तरीही नराधमांना कायद्याचा धाक राहिला की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. पुण्यातील एका शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असा मेसेज केला. हा चालक प्रत्यक्ष भेटून विद्यार्थीनीला वारंवार हेच सांगायचा. तो इथपर्यंतच थांबला नव्हता तर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जाऊनही तिला त्रास देत होता. 


मनसैनिकांनी दिला चोप 


विद्यार्थीनीच्या इंस्टाग्रामवर जाऊन तू मला आवडतेस असे सततचे मेसेज करून विद्यार्थीनीला त्रास होता. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला चांगलाच चोप दिला आहे. पुण्यातील मनसैनिकांनी ही बाबा गांभीर्याने घेतली असून संबंधित स्कूल व्हॅन चालकाला मनसेच्या गणेश भोकरेकडून चोप देण्यात आलाय. यानंतर मनसैनिकानी संबंधित स्कूल बँक चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 


आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा


विद्यार्थीनीला मेसेज करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूरची घटना ताजी असतानाच पुण्यातही मुलींना छेडण्याचे प्रकार सुरु असल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त केली आहे.