पुणे: साडी आणि भारतीय संस्कृती यांचं एक दृढं नात आहे. प्रत्येक समारंभात स्त्रीया साडी नेसणं पसंत करतात. साडीमध्ये त्यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. साडी आणि त्यातही पैठणी कुणाला आवडणार नाही. पण ही पैठणी नेसायची नाही तर खास खाण्यासाठी तयार कऱण्यात आली असं म्हटलं तर? तुम्हालाही एक क्षण ऐकून विचित्र वाटलं ना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जस केकवर वेगवेगळे फोटो किंवा आकाराचे केक तयार केले जातात तशाच पद्धतीनं पुण्यातील एका महिलेनं वेगळ्या पद्धतीनं केक तयार केला आहे. हा केक पाहून तुम्हाला एक क्षण वाटेल की ही खरीखुरी साडीच घडी घातलेली आहे. पण नाही हा तर चक्क केक आहे. हा केक पाहून तुम्हीही 2 मिनिटं नक्की फसालच. इतक्या सुंदर पद्धतीनं या जादूई हातांनी हा केक तयार केला आहे. 


पुण्यातील जे डब्लू मॅरिएट हॉटेलच्या शेफ तन्वी पळशीकर यांनी हा केक तयार केला आहे. या केकचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्यांच्या या केकचं खूप कौतुक युझर्सनी केलं आहे. 




हा केक तयार करताना आम्हाला सर्वात जास्त कष्ट लागले ते म्हणजे अलंकार तयार करण्यासाठी आणि पैठणीवरचं डिझाइन तयार करण्यासाठी. या केकला पैठणीचा हुबेहुब लूक आणायचा होता. त्यामुळे आम्हाला त्यावर मेहेनत घ्यावी लागली. हा केक युझर्सच्या पसंतीला उतरला. पैठणी केक नंतर त्यांनी आणखी एक केक तयार केला आहे. हा साऊथ इंडियन साडीसारखा केक दिसत आहे. त्यांच्या या कलाकृतीला चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद दिला आहे.