Rahul Mahajan On Baba Siddique Murder: अजित पवारांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास सुरु असून रोज या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येत असतानाच भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे पुत्र राहुल महाजनांनी एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल महाजन यांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येचा उल्लेख केला आहे. बाबा सिद्दीकींवर झालेल्या गोळीबारासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.


मी यापूर्वी बोललो नाही पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आजपर्यंत मी काही बोललो नाही. मात्र एक छोट्याश्या टोळीने बाबा सिद्दीकींची हत्या केली. या टोळीने एन्काउंटर कल्चर सुरु करुन हे सगळे गुन्हेगार 24 तासामध्ये संपवले पाहिजेत," असं राहुल महाजनांनी म्हटलं आहे. "बाबा (सिद्दीकी) हा फार चांगला माणूस होता. मला त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी फार वाईट वाटतं. सध्या जी टोळी आहे त्यामधील काहीजण तुरुंगात आहेत तर काही बाहेर. या सर्व मच्छरांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे," अशा शब्दांमध्ये राहुल महाजन यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 


सकाळपर्यंत...


"हा सारा प्रकार लवकरच थांबला नाही तर आपण पुन्हा 90 च्या दशकामध्ये जाऊ. मी हे बोलतोय याबद्दल मला माफ करा पण सर्वांना सुरक्षा देण्यापेक्षा एका ब्लॅककॅट कमांडो युनिटला हा मार्ग स्वच्छ करण्यास सांगा. सकाळपर्यंत ते तुरुंगातील या गुन्हेगारांना संपवतील," असं राहुल महाजन यांनी म्हटलं आहे.




पोलिसांना मोठं यश


माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी सुजीत सुशील सिंह याला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सिंह कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी अनमोल बिष्णोईला आरोपी करण्यात आलं आहे. अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. सिंहच्या सांगण्यावरून याप्रकरणातील अटक आरोपी नितीन सप्रे व राम कनोजिया यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर व आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची पाहणी केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 32 वर्षीय सुजीत सिंह याला काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्याने परदेशातील गुंडासोबत संपर्क साधला होता. सिंह वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरुन अनेक खात्यांवर संवाद साधत होता. ज्या व्यक्तीशी सुजीत संपर्क साधत होता तो परदेशातील गुंड अनमोल बिष्णोई असल्याचा संशय आहे. सुजीत सिंह मुंबईतील रहिवासी आहे आणि बाबा सिद्दिकीच्या हत्या प्रकरणात त्याचा शोध सुरू होता. पंजाब पोलीस व मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सिंहला लुधियानातून पकडण्यात आले होते. सिंह बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या कटात सहभागी होता. तो पूर्वी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात राहात होता.