किल्ले रायगडच्या घाटात भीषण अपघात; बस 50 फूट खोल दरीत कोसळली
रायगडमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस 50 फूट खोल दरीत कोसळली आहे.
Raigad Bus Accident : किल्ले रायगडच्या घाटात बस दरीत कोसळली. रायगडहून ऐरोलीला परत जाताना, पाचाड आणि कोंझर दरम्यान घाटात हा अपघात घडला. घाटातील अवघड वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्याने बस 50 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवानं या अपघातात बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. महाड अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तातडीनं मदतकार्य सुरु करण्यात आलं.
रायगडच्या माणगावमध्ये एका भरधाव कारने दोघांना चिरडलं
रायगडच्या माणगावमध्ये एका भरधाव कारने दोघांना चिरडलं. कचेरी रोडवर कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 1 पुरूष आणि1 महिला जखमी झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय. अपघातावेळी कारचालक एक अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती मिळालीय.
सिंधुदुर्गात मालवण-कोल्हापूर एसटी बसचा अपघात
सिंधुदुर्गात मालवण-कोल्हापूर एसटी बसचा अपघात झालाय.. मुंबई गोवा महामार्गावरील कसाल इथं हा अपघात झालाय.. बससंच स्टेअरिंग लॉक झाल्यानं चालकाचा गाडीरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली.. या दुर्घटनेत बसमधील 14 ते 15 प्रवासी जखमी झालेत... त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहराजवळ खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. मुख्य महामार्गावरून बस जवळपास 25 फूट खाली घसरली. अर्धी बस कठड्यावर अडकली. या अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झालेत. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याची माहिती मिळतेय. टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली. धडक इतकी भीषण होती ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळली.