मुंबई : Maharashtra Rainfall : राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. ( Rain in Maharashtra) सध्या राज्यात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागांत पाऊस सक्रिय होणार आहे. 


मुसळधार पावसाची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातही पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तसेच  विदर्भातील काही भागांत मुसळधार होईल अशी अपेक्षा आहे. 


कोकणमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतच आजपासून 22 ऑगस्टला काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर आणि मुंबईतही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात जोरदार बसरणार


तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत आजपासून 22 ऑगस्टला  प्रामुख्याने घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार भागात हलक्या  स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


 विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, गोंदिया, नागपूर आदी जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार, तर अकोला अमरावती, वर्धा आदी भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.