प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : गुजराती समाजाच्या (Gujrati Samaj) कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडला आहे. विरारमध्ये (Virar) एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमात पैशांची उधळण करण्यात आली. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video ). या व्हिडिओ मध्ये स्टेजवर नोटांचा खच पहायला मिळत आहे. तर, स्टेजच्या खाली एक व्यक्ती टोपली घेवून या नोटा टोपलीत गोळा करताना व्हिडिओत दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार पूर्व परिसरात सकवार येथे गुजराती समाजातर्फे एका संगीत जलासा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नोटांची उधळण करण्यात आली आहे. ही सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. नोटा उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


4 मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक श्रोते गायक आणि एकमेकांवर नोटांचा वर्षाव करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गुजराती समाजाकडून आयोजन करण्यात येत असलेल्या अशा कार्यक्रमात यापूर्वी देखिल नोटा उधळत असल्याचे प्रकार घडले होते. या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी दिली की नाही याबाबत कोणताही खुलासा होऊ शकला नाही.


 



लग्नात नोटांचा पाऊस! 


लग्नात नोटांचा पाऊस पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर अक्षर पटेल (@akshayhspatel) नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एका लग्न सोहळ्यादरम्यान ज्या घरात लग्न आहे त्या घरातील लोक घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटा खाली उधळताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हडिओ गुजरातमधील आहे. सरपंचाच्या भाच्याच्या लग्नामध्ये ही दौनत जादा करण्यात आली आहे.