Raj Thackeray On Uddhav Thackeray: राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या पर्वास सुरूवात झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मनसेची स्थापना झाली. दोन्ही भावा-भावांमध्ये राजकीय संघर्ष असला तरी व्यक्तीगत पातळीवर दोन्ही भाऊ आजही अनेक कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसतात. अशातच उद्धव ठाकरे यांच्या जुन्या आठवणींचा उजाळा देताना राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते' याचं तिसरं पर्व आता येत्या 4 जूनपासून सुरू होतंय. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसतोय. मागील दोन पर्वात अवधुत गुप्ते यांनी मनमोकळे प्रश्न विचारून अनेकांना बोलतं केलं होतं. दोन पर्वाच्या यशस्वी प्रयोगानंतर आता तिसरं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिसऱ्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


झी मराठीच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी थेट विषयाला हात घातला आणि राज ठाकरे यांच्यासमोर काही जुने फोटो दाखवले. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जुने फोटो दिसून येत आले आहेत. काय वाटतं हे सगळं एकत्र पाहून? असा सवाल गुप्ते यांनी राज ठाकरे यांना विचारला.


पाहा Video 



दरम्यान, खूप छान दिवस होते ते. माहीत नाही मला.... कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली, असं राज ठाकरे यामध्ये म्हणताना दिसत आहेत. आता परत येऊ शकणार नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणताना दिसत आहेत. राज ठाकरे या विषयावर आणखी काय काय म्हणाले, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दर रविवारी रात्री 9 वाजता खुप्ते तिथे गुप्ते हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.