Raj Thackeray In show khupte tithe gupte: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या रोखठोक आणि ठाकरी शैलीसाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे पुन्हा आक्रमक अंदाजात दिसत आहेत. अशातच सध्या त्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये ती एका मुलाखतीमुळे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते' याचं तिसरं पर्व आता येत्या 4 जूनपासून सुरू झाला आहे. या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळ्या अंदाजात उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी एक अंगावर काटा आणणारा प्रसंग देखील सांगितला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांच्याबद्दल भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी पाळीव कुत्रा चावल्याचा प्रसंग सांगितला. काही वर्षांपूर्वी शर्मिलाला आमचा पाळीव कुत्रा चावला होता आणि त्यामुळे गंभीर दुखापत झाली होती, असं राज ठाकरे सांगतात. तिच्या घरी लहानपणापासून कधीही कुत्रा नव्हता. मात्र, ती आता आमच्या घरातील कुत्र्यांवर खूप जास्त प्रेम करते, असं राज ठाकरे सांगतात. त्यावेळी त्यांनी थरारक किस्सा सांगितला.



एकदा असंच आमचा बॉण्ड कुत्रा झोपला होता आणि शर्मिला तिच्या सवयीप्रमाणे त्याचे लाड करायला गेली. ती तिथं गेली आणि जवळ गेल्यावर बॉण्डची झोपमोड झाली. पुढच्याच क्षणी तो तिला चावला. हा सर्व प्रकार भयानक होता. तिच्या गालावरची त्वचा संपूर्ण फाटली होती. दोन्ही ओठांचे साधारण सहा तुकडे झाले होते. एवढंच नाही तर गालाच्या वरच्या बाजूला असणारं हाड बाहेर आलं. मी पाहिलं तर सगळीकडं रक्त सांडलं होतं. मला नक्की काय झालं समजलं नाही. मी शर्मिलाला पाहिलं तेव्हा तिचा चेहरा फाटला होता. हिंदुजाचे आमचे डॉक्टर होते. त्यांनी लगेच टाकते घातले आणि प्लॅस्टिक सर्जरी केली, असं राज ठाकरे यांनी सांगत असताना अनेकांच्या अंगावर काटा आला.


आणखी वाचा - 'दादूस' उद्धवची आठवण काढताच राज ठाकरे भावूक, म्हणाले 'कोणीतरी विष कालवलं अन्...' पाहा Video


दरम्यान, एवढं सगळं झालं. शर्मिलाची प्लॅस्टिक सर्जरी झाली. ती हॉस्पिटलमधून घरी आली. आल्यानंतर ती बॉण्डच्या जवळ गेली आणि त्याला पुन्हा जवळ घेतलं. त्यानंतर ती आतल्या खोलीत गेली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यावर काय भावना होत्या, यावर देखील भाष्य केलंय. मला  भाऊ म्हणून वाईट वाटलं, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून तुमचं या सर्व गोष्टींवर लक्ष असायला हवं होतं.  तब्बल 40 जण तुमच्या हाताखालून निघून जातात, हे काही सतर्क असलेल्या माणसाचं लक्षण नव्हे, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोले लगावले आहेत.