मुंबई : आगामी चित्रपट 'हरहर महादेव' साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला होता. आज रविवारी अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना ठाकरेंनी एक अंगावर शहारा आणणारा अनुभव शेअर केला. (MNS Chief Raj Thackerya interview Subodh Bhave Marathi News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले राज ठाकरे?
मी एकदा 1984 साली कार्यालयात बसलो होते. शिवजयंतीचे कार्यक्रम माझ्या डायरित लिहिले होते. सामनाचे दांगट माझाकडे आले आणि म्हणाले की, शिवनेरीवर बाळासाहेब आले होते. त्यानंतर ठाकरे घराण्याचे कोणी आले नाही. ते येण्यासाठी आग्रह करत होते. माझा पारा चढत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सर्व कार्यक्रमांवर काट मारली आणि लिहिलं शिवनेरी. त्यांना फोन केला मी येतोय.


मी जुन्नरला गेलो. सकाळी 4 ला गड चढायला सुरुवात केली. वर पोहोचल्यानंतर वर एक अंधारलेली खोली पाहिली. आत शिरलो समोर भितींवर हळद आणि कुंकू असं टाकलेले होतं. त्याकडे मी एकटक बघत बसलो. मागे माझ्यावर खांद्यावर हात ठेवली आणि सांगितलं महाराजांचा जन्म इथे झाला होता हा. पण मागे वळून पाहिलं कोणी नव्हतं. आईची शपथ घेऊन सांगतोय हे. नंतर मी पाण्याची बाटली घेऊन डोक्यावर पाणी टाकलं. त्यानंतर मी बऱ्याचदा शिवनेरीवर गेलो पुन्हा असं कधीच घडलं नाही.