मुंबई : Raj Thackeray Pune Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. (Raj Thackeray on Uddhav Thackeray)  राज यांच्या भाषणात आज लक्ष्य होते ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. उद्दव ठाकरे यांनी एकतरी आंदोलन केले आहे का? त्यांच्या अंगावर एक तरी केस आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणाले, आंदोलनाची एक तरी केस अंगावर आहे का? शिवसेना बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवत असल्याची टीका यावेळी केली. शरद पवार यांनी बाळासाहेब आणि आमच्यात टीका होत असल्याचे सांगितेल. मात्र, संध्याकाळी आम्ही एकत्रित चर्चा करत होतो, असे एका कार्यक्रमात सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवत, असे ते म्हणाले.


अयोध्येचा दौरा तूर्तास स्थगित केला आहे. अयोध्या दौरा हा कार्यकर्त्यांना केसेसमध्ये अडकवायचा ट्रॅप होता. निवडणुकीत माझे कार्यकर्ते तिकडे अडकले असते. त्यामुळे माझी ताकद संपविणार नाही. माझ्या विरुद्धचा ट्रॅप मला समजला. त्यामुळे मी दौरा स्थगित केला आहे.  अयोध्या दौऱ्याविरोधात रसद राज्यातून पुरवली गेली, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.



दरम्यान, राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याच्या भूमिकेचाही चांगलाच समाचार घेतला. मातोश्री ही काय मशिद आहे का? मशिदीबाहेर हनुमान चालीसा म्हण्याचे आदेश होते. तसेच यावेळी लेडमध्ये राऊत-राणा यांच्या भेटीबाबतही राज यांनी टीका करत त्यांचा उल्लेख ढोंगी असा केला. 


भाजप खासदार ब्रुजभूषण सिंह यांच्या आव्हानालाही राज ठाकरे यांनी आजच्या सभेत उत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, यातून चुकीचे पायंडा पडत आहेत, गुजरातमधून कोणाला माफी मागायला लावणार आहात ते सांगा.  हे आंदोलन आपल्याला सुरुच ठेवायचे आहे. एकदाच काय तो तुकडा पडून जाऊ दे, असे राज म्हणाले.