राणे-शाहा भेटीवर रामदास कदमांचा टोला
शिवसेना नेते रामदास कदम यांनी नारायण राणे आणि अमित शाह यांच्या भेटीवरुन टोला हाणला आहे. मला वाटतं राणेंच्या हॉस्पिटल उद्घाटनाचं काही काम होतं. आता नारायण राणे यांना हॉस्पिटलची गरज असल्याचा टोला त्यांन लगावला आहे.
औरंगाबाद : शिवसेना नेते रामदास कदम यांनी नारायण राणे आणि अमित शाह यांच्या भेटीवरुन टोला हाणला आहे. मला वाटतं राणेंच्या हॉस्पिटल उद्घाटनाचं काही काम होतं. आता नारायण राणे यांना हॉस्पिटलची गरज असल्याचा टोला त्यांन लगावला आहे.
भाजप अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांची दिल्लीत रात्री भेट झाली. परंतु भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भेटीला जाण्यापूर्वी गाना सुनने जा रहा हू... हे सूचक वाक्य शाह बोलून गेले. यावरून गाणी म्हणजे राणेंचे गा-हाणे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कॉग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांच्या पुढील राजकीय वाटचाली संदर्भात अद्यापही संभ्रम कायम आहे. भाजच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील बैठकीत अमित शहांबरोबर भाजप प्रवेशाबद्दल राणेंची कुठलीच चर्चा झाली नाही. राणे सिंधुदुर्गात उभारत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाबाबत राणेंची ही भेट असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवेंनी म्हटलं आहे.
दुसरीकडे राणे भाजपात प्रवेश करणार नाहीत ते स्वत:चा वेगळा पक्ष काढतील आणि भाजप आघाडीत सामील होतील अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. कॉंग्रेस सोडण्याची घोषणा करून 6 दिवस झाले तरी राणेंनी सुद्धा आपली पुढील राजकीय वाटचाल कशी असेल हे स्पष्ट केलेले नाही.