सिंधुदुर्ग : Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने आपले वर्चस्व मिळवले आहे. 19 जागांपैकी 11 जागा जिंकत महाविकास आघाडीला दे धक्का दिला आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने वर्चस्व मिळविल्यानंतर भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात येत आहे. (Rane panel wins over Sindhudurg District Co-operative Bank)


सतीश सावंत पराभूत, भाजपचा जल्लोष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीआधी शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पेटला होता. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर (Santosh Parab attack case ) राजकीय राडा पाहायला मिळाला. हे प्रकरण पोलिसांत गेले. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही हल्ल्याचा कटाचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. आजच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. मात्र, राणे गटाने आपले वर्चस्व मिळवले आहे.


सिंधुदुर्गात जिल्हा बँक निवडणुकीत महाविकासआघाडीला धक्का बसला आहे. हल्ल्याचा आरोप असलेले भाजपचे मनीष दळवी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झालेत. विठ्ठल देसाई आणि सतीश सावंत यांना समसमान मते पडलीत. त्यानंतर चिठ्ठीद्वारे नशीब अजमवण्यात आले. यामद्ये विठ्ठल देसाई विजयी झाल्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला.



जिल्हा बँकेच्या जिल्हा बँकेच्या मतमोजणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. यावेळी भाजप 4 शिवसेना 4 अशी चुरशीची लढत दिसून आली. आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट झाले. भाजपने जोरदार आघाडी घेत बँकेवर आपली सत्ता आणली आहे. मतमोजणीच्यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली.


राणेसमर्थक सिद्धिविनायक पॅनलला सुरुवातील 7 जागांवर विजय मिळाला तर महाविकासआघाडीच्या पॅनलला 5 जागा मिळाल्या. कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्यानंतर उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चिठ्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झालेत.


एकूण 19 जागांपैकी प्रत्येकी चार-चार जागांवर महाविकासआघाडी आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सुरुवातीला आघाडी घेतली होती. शेवटचा निकाल हाती आला त्यावेळी राणे पॅनेलने 11 जागा जिंकल्या. तर केवळ 8 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यामुळे बँकेवर आता राणे गटाची सत्ता असणार आहे. हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.