सिंधुदुर्ग : Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने पहिल्या मतमोजणीत बाजी मारली आहे. विद्यामान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत हे पराभूत झाले आहेत. सावंत यांच्या पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी 98.67 टक्के मतदान झाले होते. 981 पैकी 968 मतदारांनी हक्क बजावत 19 संचालक पदासाठी रिंगणात असलेल्या 39 उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. सकाळी 9 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीत मतमोजणी सुरू झाली.
यावेळी महाविका आघाडीचे 4 तर भाजपचे 3 उमेवार विजयी झाली. एका जागेसाठी टाय झाली. टाय झालेल्यामध्ये सतीस सावंत यांचा समावेश आहे. ईश्वर चिठ्ठीच्या सहाय्याने निकाल देण्यात आला. यावेळी सावंत यांच्या बाजुने कौल मिळाला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. विठ्ठल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या गोठात मोठा जल्लोष करण्यात आला आहे.
- देवगडमधून प्रकाश बोडस (भाजप)
- वेंगुर्लाभाजपचे मनीष दळवी (भाजप)
- दोडामार्गमधून प्रकाश गवस (भाजप)
- विधारधर परब (महाराष्ट्र विकास आघाडी)
- व्हीकातर डोंतास (महाराष्ट्र विकास आघाडी)
- दिलीप रावराणे (महाराष्ट्र विकास आघाडी)