Republic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले.
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले. 'साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर' संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली सगळ्यांचीच मनं जिंकलीत.
देशाच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन, 44 विमानांचा फ्लायपास्ट
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्यपथावर नारी शक्तीचं दर्शन दिसले. बीएसएफच्या महिला उंट सवार टीमसह विविध राज्यांच्या चित्ररथांनीही केला स्त्री-शक्तीचा जागर झाला. तर कर्तव्य पथावरच्या परेडमध्ये इजिप्तच्या सैनिकांच्या तुकडीचाही समावेश. 144 सैनिकांचं संचलन, कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फत्ताह एल खारासावी यांनी केलं तुकडीचं नेतृत्त्व केले. तर काश्मीरच्या लालचौकातही तिरंगा फडकवला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Republic Day 2023 Updates : 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विविध राज्यांच्या रथांचे संचलन
74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन दिसले. 44 विमानांचा फ्लायपास्ट खास आकर्षण ठरला. देश आज अत्यंत उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. सालाबादप्रमाणे कर्तव्य पथवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सैन्यदलांनी मानवंदना दिली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळी राष्ट्रीय युद्धस्मारकावर शहिदांना मानवंदना दिली. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. इजिप्तच्या सैन्यदलांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मनं जिंकली.
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रथमच परदेशी सैन्यदलांचं पथक सहभागी झालं. संचलनाची सुरुवात मेकनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंटने केली. भारतीय सैन्यदलाचे विविध रणगाडे, चिलखती वाहनं, के 9वज्र सारख्या तोफा, आकाश सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम सहभागी झाले. लष्कराच्या इन्फन्ट्री रेजिमेंटच्या पंजाब, मराठा लाईट इन्फन्ट्री, बिहार या रेजिमेंट, वाय़ुदल, नौदलाच्या पथकांनी शानदार संचलन केलं.
संपूर्ण सोहळ्यात मेड इन इंडिया हा मंत्र होता. संपूर्ण सोहळ्यात केवळ भारतीय बनावटीची शस्त्रास्त्र सादर करण्यात आली. यावर्षी संपूर्ण सोहळ्यावर नारीशक्तीचा प्रभाव होता. वायुदल, नौदलाच्या पथकांचं प्रमुखपद महिला अधिका-यांकडे होतं. सीआरपीएफचं संपर्ण महिलांचं पथक होतं. तर दिल्ली पोलिसांचं संपूर्ण महिलांचं बँड पथक होतं. विविध राज्याच्या चित्ररथाद्वारेही महिलाशक्तीचा जागर करण्यात आला.