Republic Day 26 January : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. प्रजासत्ताक दिनाचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या LIVE ब्लॉगशी कनेक्ट राहा.
26 Jan 2023, 13:16 वाजता
प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आकर्षण
- प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण, 'साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर' संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली सगळ्यांचीच मनं.
- प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्यपथावर नारी शक्तीचं दर्शन...बीएसएफच्या महिला उंट सवार टीमसह विविध राज्यांच्या चित्ररथांनीही केला स्त्री-शक्तीचा जागर
- कर्तव्य पथावरच्या परेडमध्ये इजिप्तच्या सैनिकांच्या तुकडीचाही समावेश. 144 सैनिकांचं संचलन, कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फत्ताह एल खारासावी यांनी केलं तुकडीचं नेतृत्त्व..
- काश्मीरच्या लालचौकातही फडकवला तिरंगा. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त..
- 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन...४४ विमानांचा फ्लायपास्ट
#RepublicDay2023 | 33 Dare Devils make 'Human Pyramid' on nine motorcycles on Kartavya Path pic.twitter.com/s7R3piu6Wo
— ANI (@ANI) January 26, 2023
26 Jan 2023, 13:08 वाजता
74 वा प्रजासत्ताक दिनात भारतीय सैन्यदलाची दिसली ताकद
Republic Day 2023 LIVE Updates : देश आज अत्यंत उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. सालाबादप्रमाणे कर्तव्य पथवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सैन्यदलांनी मानवंदना दिली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळी राष्ट्रीय युद्धस्मारकावर शहिदांना मानवंदना दिली. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. इजिप्तच्या सैन्यदलांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मनं जिंकली.
Republic Day 2023: Marching contingents at Kartavya Path showcase India's military might
Read @ANI Story | https://t.co/Ls68kkLv6W#RepublicDay #IndianArmy #MilitaryContingent #KartavyaPath #RepublicDay2023 #RepublicDayParade pic.twitter.com/c8l3uDxGTr
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2023
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रथमच परदेशी सैन्यदलांचं पथक सहभागी झालं. संचलनाची सुरुवात मेकनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंटने केली. भारतीय सैन्यदलाचे विविध रणगाडे, चिलखती वाहनं, के 9वज्र सारख्या तोफा, आकाश सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम सहभागी झाले. लष्कराच्या इन्फन्ट्री रेजिमेंटच्या पंजाब, मराठा लाईट इन्फन्ट्री, बिहार या रेजिमेंट, वाय़ुदल, नौदलाच्या पथकांनी शानदार संचलन केलं.
Spectacular flypast by 50 aircraft during 74th Republic Day celebration leaves people stunned
Read @ANI Story | https://t.co/EJFEvCIDyW#RepublicDay #RepublicDay2023 #RepublicDayParade #FlyPast #KartavyaPath pic.twitter.com/zZm66jlX1c
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2023
संपूर्ण सोहळ्यात मेड इन इंडिया हा मंत्र होता. संपूर्ण सोहळ्यात केवळ भारतीय बनावटीची शस्त्रास्त्र सादर करण्यात आली. यावर्षी संपूर्ण सोहळ्यावर नारीशक्तीचा प्रभाव होता. वायुदल, नौदलाच्या पथकांचं प्रमुखपद महिला अधिका-यांकडे होतं. सीआरपीएफचं संपर्ण महिलांचं पथक होतं. तर दिल्ली पोलिसांचं संपूर्ण महिलांचं बँड पथक होतं. विविध राज्याच्या चित्ररथाद्वारेही महिलाशक्तीचा जागर करण्यात आला.
74th Republic Day parade highlights 'Atmanirbhar Bharat'
Read @ANI Story | https://t.co/5CoPZ5iRvc#AtmaNirbharBharat #RepublicDay #74thRepublicDay #RepublicDay2023 #RepublicDayParade pic.twitter.com/yUniWGuExk
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2023
26 Jan 2023, 11:54 वाजता
विविध राज्यांच्या रथांचे संचलन
Republic Day 2023 LIVE Updates : 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या झांकीमध्ये 'नारी शक्ती'चा रथ आकर्षण ठरला होता. तर हरियाणाची झांकी भगवद्गीतेवर आधारित रथ साकारण्यात आला होता. महाभारताच्या युद्धातील विविध दृश्ये दाखवण्यात आलीत.
Corps of Signals Dare Devils team mesmerises the audience with their performance at Kartavya Path on Republic Day pic.twitter.com/L9nHd3M8CA
— ANI (@ANI) January 26, 2023
The colourful tableaux of West Bengal, Maharashtra and Tamil Nadu at the Republic Day parade pic.twitter.com/8xeN90Hrmt
— ANI (@ANI) January 26, 2023
74th Republic Day parade: Ministry of Home Affairs' tableau reflects resolve to make India drug-free
Read @ANI Story | https://t.co/9NzeBIjKEh#MHA #RepublicDay #RepublicDay2023 #RepublicDayParade #DrugfreeIndia pic.twitter.com/WEE7RKDFla
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2023
74th Republic Day parade: A tableau displaying millets at Kartavya Path
Read @ANI Story | https://t.co/UbyBGB84nG#RepublicDay #RepublicDay2023 #KartavyaPath #InternationalYearOfMillets pic.twitter.com/8pDaZjqa9a
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2023
#RepublicDay | Haryana's tableau reflects design based on Bhagavad Gita. In its entirety, the tableau shows Lord Krishna serving as the charioteer of Arjun and giving him knowledge of Gita. The patterns on the sides of the trailer show various scenes from the battle of Mahabharat pic.twitter.com/5t3B5nJxuM
— ANI (@ANI) January 26, 2023
26 Jan 2023, 10:50 वाजता
कर्तव्य पथावर देशाचा तिरंगा फडकवला
Republic Day 2023 : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर तिरंगा फडकवण्यात आला. प्रथमच देशी बनावटीच्या 105 फील्ड गनमधून सलामी देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना अभिवादन केले. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचले. पंतप्रधान मोदींनी येथे शहीद जवानांना अभिवादन केले.
#RepublicDay | AKASH weapon system of 27 Air Defence Missile Regiment, 'the Amritsar Airfield' led by Captain Sunil Dasharathe and accompanied by Lt Chetana Sharma of 512 Light AD Missile Regiment (SP) pic.twitter.com/aAzsFJfpUI
— ANI (@ANI) January 26, 2023
Republic Day 2023: President Droupadi Murmu unfurls Tricolour, gets ceremonial 21 Gun salute
Read @ANI Story | https://t.co/bZGklpEmyE#RepublicDay #DroupadiMurmu #RepublicDayIndia #RepublicDay2023 #KartavyaPath #26january pic.twitter.com/oaxBz78MmU
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2023
#RepublicDay2023 | The detachment of Brahmos of the 861 Missile Regiment, led by Lieutenant Prajjwal Kala, participates in the parade at Kartavya Path. pic.twitter.com/tEt4dcmm6T
— ANI (@ANI) January 26, 2023
26 Jan 2023, 10:09 वाजता
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन
Republic Day 2023 : 74 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कर्तव्य पथवर भारताच्या सामर्थ्याचं शानदार संचलन करण्यात आले. देशभरात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
यावर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याची थिम जन भागीदारी अशी ठरवण्यात आली आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत. काल त्यांचं भारतात आगमन झालं. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सैन्यदलांचं संचलन... सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतल्या विजय चौकातून हे संचलन सुरू झाले. यावर्षी प्रथमच इजिप्त सैन्यदलांचं संयुक्त पथक प्रजासत्ताक दिन सोहळ्यात संचलन करत आहे.
Republic Day 2023: History, significance of January 26
Read @ANI Story | https://t.co/7YvVQ61tSU#RepublicDay #74RepublicDay #26january pic.twitter.com/aCAae7m8tb
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2023
#RepublicDay | PM Modi leads the nation in paying homage to the fallen soldiers at the National War Memorial in Delhi pic.twitter.com/CE9B2CPZmB
— ANI (@ANI) January 26, 2023
26 Jan 2023, 09:56 वाजता
'झी समूहा'च्या मुख्य कार्यालयातही प्रजासत्ताक दिन उत्साहात
Republic Day 2023 : मुंबईतील 'झी समूहा'च्या मुख्य कार्यालयातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजता झीच्या मुख्यालयात झी समूहाचे व्यवस्थापन प्रमुख श्रीराम कुंभारे यांनी ध्वज फडकावून सलामी दिली. यावेळी 'झी समूहा'च्या इमारतीचा सुरक्षा वृंद. 'झी समूहा'तील विविध कंपन्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
26 Jan 2023, 09:47 वाजता
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन
Republic Day 2023 : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत. मुंबईतील शिवाजी पार्क इथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राज्य सरकारच्या विविध 16 विभागांमार्फत चित्ररथ सादर करण्यात येत आहेत. शिवाजी पार्क इथे विविध विभागांकडून वैशिष्ट्यपूर्ण परेड झाली.
26 Jan 2023, 09:07 वाजता
पंतप्रधान मोदी यांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Republic Day 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केलेय, 'प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा. यावेळी हा प्रसंग देखील खास आहे. कारण आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान साजरा करत आहोत. देशाच्या थोर स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार व्हावीत, एकजुटीने पुढे जावे, हीच आमची इच्छा. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। इस बार का यह अवसर इसलिए भी विशेष है, क्योंकि इसे हम आजादी के अमृत महोत्सव के दौरान मना रहे हैं। देश के महान स्वतंत्रता सेनानियों के सपनों को साकार करने के लिए हम एकजुट होकर आगे बढ़ें, यही कामना है।
Happy Republic Day to all fellow Indians!
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
26 Jan 2023, 08:03 वाजता
प्रजासत्ताक दिनाच्या वाळूशिल्प साकारुन शुभेच्छा
Republic Day 2023 : भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पाद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. चित्रकार रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प वेंगुर्ला येथील सागरतीर्थ किनाऱ्यावर साकारले आहे. वाळू आणि रंगोळी वापरुन त्यात महापुरुषांचे कोरलेले चित्र आकर्षणाचा विषय ठरत आहेत.
26 Jan 2023, 07:48 वाजता
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाची सजावट
Republic Day Live Updates : आज भारतीय स्वातंत्र्याचा 74 प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये उत्साहात साजरा होत आहे. याच माध्यमातून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही तिरंगा रंगाची सजावट शेकडो टन फुले वापरून केलेली आहे पुण्यातील श्री विठ्ठल भक्त सचिन अण्णा चव्हाण यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुंदर अशी सजावट केलेली आहे. यामुळे संपूर्ण विठ्ठलाने रुक्मिणी मंदिर हे तिरंगामध्ये झाल्याचे या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे.