खंडणी प्रकरणी `अंडरवर्ल्ड डॉन`च्या हस्तकाला अटक
`अंडरवर्ल्ड डॉन` दाऊद इब्राहिमचा मुंबईतील हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियाज भाटी याला ठाण्यात अटक करण्यात आलीय.
ठाणे : 'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमचा मुंबईतील हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियाज भाटी याला ठाण्यात अटक करण्यात आलीय.
रियाज भाटी व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध ठाणे खंडणी विरुद्ध पथकाने अपहरण, जीवे ठार मारण्याची धमकी देणे व खंडणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय.
अंबरनाथ येथील एका बिल्डरला खंडणीसाठी धमकवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.