मुंबई : काल सकाळपासून घडत असलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. लोकसभा निवडणुकांवेळी पार्थ पवार यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले त्यावेळीही रोहित पवार यांनी अशीच एक भावनिक पोस्ट टाकली होती. या निवडणुकंच्या काळात सतत शरद पवारांच्या आसपास दिसणारे रोहित पवार यांनी आजच्या पोस्टमधूनही भावनिक आवाहन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांचा पुतन्या आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला आपल्या समर्थन दिलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. ज्याचे हादरे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना बसला. शरद पवारांच्या विरोधात जावून त्यांनी ही भूमिका घेतली. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापनेची तयारी केली असताना अचानक अजित पवारांनी सगळ्यांनाच धक्का दिला. अजित पवार यांनी असं का केलं याचं उत्तर तर ते देऊ शकतील. पण त्यांच्या या कृतीमुळे पवार कुटुंबात नक्कीच फूट पडली आहे.



संबंधित बातमी: दादा कुटुंबात फाटाफूट नको, राजीनामा दे, सुप्रिया सुळेंचं भावनिक आवाहन


याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन परत येण्याचं भावनिक आवाहन केलं होतं. आता रोहित पवार यांनी देखील यावर भावनिक पोस्ट लिहिली.