पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत बेबनाव चित्र दिसून आलं. बहुजन विकास आघाडी विरुद्ध काँग्रेस असं चित्र दिसतं आहे. कारण आज बहुजन विकास आघाडीकडून बळीराम सुकुर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून सचिन दामोदर शिंगडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान बहुजन विकास आघाडी पुरस्कृत महाआघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोल ताश्यांच्या गजरात पालघर तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाआघाडीकडून पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला सोडण्यात आली आहे. मात्र बविआने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. आज माजी खासदार बळीराम जाधव यांनी बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला. बहुजन विकास आघाडीने यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.


बळीराम जाधव यांचा सामना शिवसेनेच्या राजेंद्र गावितांशी होणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपकडून लढणारे राजेंद्र गावित आता शिवसेनेकडून लढत आहेत. शिवसेनेने या जागेवर दावा केल्याने भाजपने ही जागा शिवसेनेसाठी सोडली होती. पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला होता.