कऱ्हाडच्या पठ्ठ्याची कमाल! रिक्षामध्ये साकारला शिवचरित्राचा देखावा, अमोल कोल्हेंनाही भुरळ
कलाकृती पाहून अमोल कोल्हेंना FB LIVE करण्याचा मोह आवरेना!
Amol Kolhe : येत्या दसऱ्याला खासदार अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप (ShivPratap Garudzep Movie) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचा अध्याय या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिकेत असणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमोल कोल्हे दौरे करताना दिसत आहे. अशातच आता कऱ्हाडमधील एका रिक्षाची अमोल कोल्हेंना भुरळ पडली.
खासदार अमोल कोल्हे एका कार्यक्रमानिमित्त कऱ्हाडला (Satara Karhad) गेले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक घटनेचं महत्त्व सांगणाऱ्या एका रिक्षाची कोल्हे (Amol Kolhe Rickshaw) यांना भुरळ पडली. त्यानंतर कोल्हे यांना फेसबूक लाईव्ह करण्याचा मोह आवरला नाही. त्यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील देखील होते. सागर शिंदे नावाच्या व्यक्तीची ही रिक्षा होती.
सागर शिंदे याने आपल्या लाडक्या रिक्षामध्ये शिवकालीन घटनांची माहिती अचूक रेखाटली आहे. अमोल कोल्हे यांनी रिक्षाची माहिती घेतली. त्याचबरोबर रिक्षात बसून कलाकृतींची पाहणी देखील केली. त्यावेळी सागर शिंदे (Sagar Shinde Rickshaw) यांनी सजावटीविषयीची माहिती दिली. त्यानंतर कोल्हे यांनी सागरसोबत सेल्फी देखील घेतला. त्यावेळी अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.
रिक्षामध्ये शिवाजी महाराजांचा देखावा आहे. त्याचबरोबर संभाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य शपथेचा फोटो आहे. अपरिचित मावळ्यांची माहिती देखील दिली आहे. सामाजिक संदेश, पोलिसांसाठी संदेश, किल्ल्यांचा देखावा दाखवण्यात आला आहे. ही रिक्षा पाहून अमोल कोल्हे यांना मोह आवरला नाही. त्यांनी थेट फेसबूक लाईव्ह (Facebook live amol kolhe) करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली.
मंदिरात 'मुन्नी बदनाम हुई'वर Reels! सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी मुलीचे कारनामे
"शिवभक्ती जोपासत आहे, त्यांना माझा मानाचा मुजरा... शिवभक्ती जपत आहात, त्यामुळे तुमचं खुप खुप धन्यवाद",असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. तर वाट दावतोय रिक्षावाला.. या कराडच्या मावळ्याचा अभिमान वाटतो.
संग्राम आणि सागर शिंदे तुमचं खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा, असं कॅप्शन कोल्हे यांनी पोस्ट करताना लिहिलं आहे.