मंदिरात 'मुन्नी बदनाम हुई'वर Reels! सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी मुलीचे कारनामे

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही... मुलीच्या व्हिडिओने नाव वाद

Updated: Oct 4, 2022, 08:53 PM IST
मंदिरात 'मुन्नी बदनाम हुई'वर Reels! सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी मुलीचे कारनामे title=

Trending News : सोशल मीडियावर (Social Media)  प्रसिद्धीसाठी आणि लाईक्स मिळवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जाऊ शकतात. आजच्या युवा पिढीला रिल्स (Reels) बनवायचं व्यसन लागलं आहे. पण हे रिल्स बनवताना आपण कोणत्या विषयावर बनवतो आहे, कोणत्या ठिकाणी बनवतोय याचं भानही बाळगताना दिसत नाहीत. असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी एका मुलीने चक्क एका मंदिरात हिंदी गाण्यावर (Hindi Song) रिल्स बनवला. या व्हिडिओने नवा वाद उभा राहिला आहे. 

मध्यप्रदेशमधल्या (MadhyaPradesh) छतरपूर इथली ही घटना असून इथल्या एका प्रसिद्ध मंदिरात या इन्स्टा स्टार नेहा मिश्राने (Neha Mishra) 'मुन्नी बदनाम हुई' (Munni Badnaam Hui Song) या गाण्यावर व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत तीने परिधान केलेल्या कपड्यांवरुनही टीका होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही अशा घटना उघडकीस आल्या आहेत. पण इशारा दिल्यानंतरही पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत. तर बजरंग दलानेही  (Bajrang Dal) तीव्र आक्षेप नोंदवला. मोठ्याप्रमाणावर टीका झाल्यानंतर नेहा मिश्राने सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ डिलिट केला.

नेहा मिश्राने मागितली माफी
नेहा मिश्रा हिचे इन्स्टाग्रामवर (Instagram) 4 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मंदिरातील व्हिडिओवर वाद झाल्यानंतर तीने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. यात तिने म्हटलंय, मला माफ करा, मंदिरात जाऊन व्हिडिओ बनवणं चुकीचं होतं, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@muskanm125)