SAIL Bharti 2024:   स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. येथे दहावी ते एमबीबीएस उत्तीर्णांना नोकरीची संधी मिळणार आहे. रिक्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाख 50 हजार ते 1 लाख 60 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 314 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

पगार


सुपर स्पेशालिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने डीएम/डीएनबी इन सुपर स्पेशालिटीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.  या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाख 50 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. स्पेशालिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमबीबीएससोबत पीजी डिप्लोमा/ पीजी डिग्री असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या पीडी डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 1 लाख 20 हजार तर पीजी डिग्री केलेल्या उमेदवारांना 1 लाख 60 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएस/ इंडस्ट्रीयल हेल्थ इन डिप्लोमा किंवा असोशिएटमध्ये शिक्षण पूर्ण केलेले असावे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 90 हजार ते 1 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे.

अर्ज शुल्क


अर्ज करताना कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराला किती शुल्क भरावे लागेल? याची माहिती जाणून घेऊया. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 500 रुपये शुल्क आकारले जाईल. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/ईएसएम/ डिपार्टमेंटल कॅन्डीडेटकडून 200 रुपये शुल्क घेतले जाईल. 

पुस्तक हातात घेतल्यावर डुलक्या येतात? जाणून घ्या अभ्यासाच्या 8 टिप्स


उमेदवारांनी आपले अर्ज  मानव संसाधन विकास केंद्र, (बीएसपी मेन गेट जवळ), भिलाई स्टील प्लांट, भिलाई 490001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 18 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या मुदतीपूर्वी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

दहावी उत्तीर्णांनो, भविष्यात IPS बनायचंय? मग या चुका अजिबात करु नकाच


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा