मुलाचा वाढदिवस आहे, 10 हजार रुपये दे नाहीतर... थेट कार्यालयात घुसून अभियंत्याला धमकी
अभियंत्याच्या कार्यालयात घुसून धमकी दिल्याच्या प्रकरणाची संभाजीनगरमध्ये चर्चा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) एक विचित्र घटना समोर आली असून या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. एका आरोपीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसून कार्यकारी अभियंत्याला (Executive Engineer) धमकावत पैशांची मागणी केली. कार्यकरी अभियंत्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या (Police Arrest Accused) आहेत. सोनेश चंद्रकांत बनसोडे असं आरोपीचं नाव आहे. (accused threaten to engineer for son birthday party)
काय आहे नेमकं प्रकरण?
आरोपी सोनेश बनसोडे याच्या मुलाचा वाढदिवस (Birthday) आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोनेशला पैशांची गरज होती. यासाठी सोनेशने थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक मारली. कार्यालयात गेल्यानंतर त्याने कार्यकारी अभियंता अशोक येरकर यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. सोनेशने अशोर येरकर यांना धमकी देत मला 10 हजार रुपये दे, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे असं सांगितलं. त्यानंतर त्याने पैसे दिले नाही तर तू इथे नोकरी कशी करतो तेच पाहतो, असंही धमकावलं. यावरच तो थांबला नाही, त्याने अशोक येरकर यांना शिवीगाळ केली. तसंच पैसे दिने नाहीत म्हणून त्याने अशोक येरकर यांना धक्काबुक्कीही केली.
अशोक येरकर यांनी आरोपीला समजावलं
कार्यकारी अभियंता अशोक येरकर यांनी परिस्थिती हाताळत आरोपी सोनेश बनसोडेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने अशोक येरकर यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहून अशोक येरकर यांनी याबाबतची माहिती वेदांतनगर पोलिसांना फोन करुन दिली.
हे ही वाचा : शिक्षकच असं वागत असतील तर...? 'या' कारणाने नववीतल्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
दांतनगर पोलिसांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेत, धमकी देणाऱ्या सोनेश बनसोडला ताब्यात घेतलं. याप्रकरणी आरोपी सोनेश बनसोडे याच्याविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.