शहराचं नाव बदलायचं असेल तर एकदा... इम्तियाज जलिल यांचं सरकारला आव्हान
Sambhaji Nagar: औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे, या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी आंदोलन पुकारलं असून शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी आव्हान दिलं आहे
Aurangabad Name Change Controversy: औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने ठेवला आणि केंद्रीने त्याला मंजूरी दिली. आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) असं नामांतर झालं आहे. पण या निर्णयाला एमआयएमचे (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) खासदार इम्तियाज जलिल (Imtiyaz Jaleel) यांनी जोरदार विरोध केला आहे. चार मार्चपासून इम्तियाज जलिल यांनी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. राजकारणासाठी शहराचं नामांतर करण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
'औरंगाबादशी भावना जोडल्या गेल्यात'
हा कोणताही राजकीय स्टंट नाही, हे माझं शहर आहे, त्यासोबत आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, आमच्या शहराचं नाव मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (Delhi) बसून घेऊ शकत नाहीत असा इशाराही इम्पियाज जलिल यांनी दिला आहे. देशात लोकशाही, तुमची हुकूमशाही चालणार नाही, त्यामुळे नामांतराचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं इम्तियाज जलिल यांनी म्हटलंय.
इम्तियाज जलिल यांनी दिलं आव्हान
तुम्हांला खरंच शहराचं नाव बदलायचं असेल तर मतदान घेऊन शहराचं नाव बदलून दाखवा, जास्त मतं नामांतराच्या बाजूने पडली तर आम्हीही बदललेलं नाव मान्य करू असं आव्हान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला दिलंय. नामांतराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने साखळी आंदोलन सुरू आहे यावेळी ते बोलत होते
हे ही वाचा : तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर
रूबंदी करायची असेल तेव्हा... आमदार, खासदार ,नगरसेवक निवडायचे असेल तेव्हा मतदान घेतलं जातं .मग नामांतर करण्यासाठी का मतदान घेतलं गेलं नाही असा सवाल देखील जलील यांनी उपस्थित केला आहे. तर महापालिकेने संभाजीनगर नावाचा प्रस्ताव दिला असताना फक्त दोन मंत्र्यांनी बसून उद्धव ठाकरे यांना श्रेय जाऊ नये म्हणून नाव बदलायचा प्रस्ताव कसा पाठवला असा देखील सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.