Sambhaji Nagar Accident: सध्या रिल्स बनवण्याच्या ट्रेण्ड आलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून सर्वजण रिल्स बनवून लाईक्स, कमेंट्स कशा मिळतील, याकडे लक्ष देतात. पण हेच रिल्स कधी जीवाशी बेतेल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका युवतीला रिल बनवणं जीवाशी बेतलं आहे. हे रिल्स तिच्या आयुष्यातलं शेवटचं ठरलं. आता ते रिल्स पाहण्यासाठी ती या जगात नाही. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संभाजीनगरच्या शुली बंधन  दत्त मंदिराजवळ ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  


एक मुलगी कार चालवत होती. समोरुन मित्राला रिल्ससाठी कॅमेरा शूटींग करायला सांगत होती. समोरच्या व्यक्तीने कॅमेरा चालू केला. ठरल्याप्रमाणे तरुणीने कार कार रिवर्स घेतली. पण नको ते घडलं. कारवरचा तिचा ताबा सुटला. कार रिव्हर्स मागे दरीत जाऊन कोसळली. 


पाहा व्हिडीओ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)


या अपघातात युवतीचा मृत्यू झालाय. श्वेता दिपक सुरवसे असे युवतीचे नाव असून ती 23 वर्षांची होती. ती छत्रपती संभाजी नगर शहरात राहत होती.  श्नेता आणि तिचा मित्र हे छत्रपतीसंभाजीनगर येथून कारने सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात आले. दुपारची वेळ होती. शेजारी काही पर्यटकही होते. दरम्यान श्वेताने आपल्या मित्राव मोबाईलवर रिल्स बनवयाला सांगितले. 


हे करत असताना तिच्याकडून रिव्हर्स गिअर पडला. एक्सलेटवर दाबले गेले. यानंतर तिचा मित्र क्लच क्लच असे ओरडत राहिला. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कार थेट डोंगरावरुन कंलंडत खाली गेलीय यात श्वेताचा मृत्यु झाला.