`मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू` संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
Sambhaji Bhide : सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून सुरुवात झाली. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Sambhaji Bhide : सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलंय. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान, असं वक्तव्य भिडेंनी केलंय. सत्ताकारण आणि अर्थकारण शूद्र आहेत. ते थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचं भिडे म्हणालेत. देशातील उत्सवांवरही त्यांनी भाष्य केलंय. नवरात्रोत्सावानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्न करताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्त्व्याने नवा वाद उभा राहाण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे?
देशाच्या पाठीवर असंख्य अतिक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान आहे. हिंदी-चिनी आणि हिंदी मुस्लिम भाई म्हणाऱ्या हिंदूना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण,चांगलं कोण,हे कळत नाही. कारण हिंदू महामूर्ख आहे. गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवाचा दांडिया हिंदू समाजाला XXडू बनवत चालला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असे ही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
त्याच बरोबर राजकारण, सत्ताकारण,अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची गरज आहे असं विधान देखील संभाजी भिडे यांनी केलं आहे. दुर्गामाता दौडीमध्ये असणाऱ्या पोलिसांनी देखील टोप्या घालून आपल्या सोबत दौडीत पळालं पाहिजे, असंही भिडे यांनी यावेळी सांगितलं.
विरोधकांची टीका
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार व्यक्तीला नाही अशी टीका करत संभाजी भिडे यांच्यावर काय कारवाई करणार असा सावल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारं असल्याचा आरोपही संभाजी भिडे यांनी केला आहे.