सातारा : सातारा जिल्ह्यातील वडुजमध्ये तरुणांनी अनोखं आंदोलन केलं. रस्त्यात पडलेल्या खड्डयांचं मोजमाप करुन खड्डयांची संख्याही जाहीर केली. सार्वजनिक बांधकामांचं 52हजार खड्डे तर जिल्हा परिषदेचे 10 हजार खड्डे वडुज नगरपंचायत हद्दित आहेत. 


वडूज शहरातील आणि पेडगाव रस्त्यावरील खड्डयांचा मोजमाप शुभारंभ सोहळा करण्यात आला. यावेळी नगरसेवक शहाजीराजे गोडसे आणि संजय गांधी निराधार योजनेचे विजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम बांधकाम विभागाच्या शुभहस्ते करण्यात आला.