PHOTO : 9 वर्ष लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 'त्या' एका चुकीमुळे तुटलं बिपाशाशी नातं; बिपाशापूर्वी 'या' अभिनेत्री करायचं होतं लग्न

Entertainment : बॉलिवूडमध्ये असं अनेक कपल आहेत, जे प्रेम कोणाशी करता आणि लग्न दुसरीसोबत होतं. बॉलिवूडमधील हा अभिनेत्याने एका अभिनेत्रीला प्रेम केलं तिला लग्नाची मागणी घातली. पण करिअरसाठी तिने आपलं नातं तोडलं. त्यानंतर दुसऱ्या अभिनेत्रीसोबत 9 वर्ष लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एका चुकीने तेही नातं संपुष्टात आलं.  

| Dec 17, 2024, 00:31 AM IST
1/10

मॉडेलिंग आणि अभिनयाच्या विश्वात त्याने नाव कमावलं. पण तो त्याचा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत राहिला. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय हा फिटनेस गुरु आज 52 व्या वाढदिवस आहे. 

2/10

हा अभिनेता आहे जॉन अब्राहम, याचा जन्म 17 डिसेंबर 1972 रोजी मुंबईत गुजराती-मल्याळी कुटुंबात झाला. जॉन अब्राहमने मेट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे.

3/10

अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी जॉन अब्राहमने मॉडेलिंगमध्ये प्रसिद्धी मिळवली. जॉनने त्याच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात जॅझी बीच्या म्युझिक व्हिडीओ 'सुरमा'मधून केली होती. जॉन अब्राहम पंकज उदास, बाबुल सुप्रियो, हंस राज हंस यांसारख्या गायकांच्या संगीत व्हिडीओमध्ये दिसला आहे.

4/10

जॉन अब्राहमने 2003 मध्ये आलेल्या 'जिस्म' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जॉन अब्राहम 'दोस्ताना', 'धूम', 'गरम मसाला', 'रेस 2', 'बाबुल', 'मद्रास कॅफे' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.

5/10

जॉनने 2012 मध्ये आलेल्या 'विकी डोनर' चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी 'मद्रास कॅफे'ची निर्मिती केली. जॉन अब्राहमच्या दोन्ही चित्रपटांचे समीक्षकांनी खूप कौतुक केले.

6/10

जिस्म या चित्रपटादरम्यान बिपाशाची जॉनसोबतची जवळीक वाढली होती. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. 9 वर्ष लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचं नातं संपुष्टात आलं. खरं तर जॉनच्या एका चुकीमुळे त्यांचं नातं तुटलं.

7/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2014 मध्ये जॉन अब्राहमने नवीन वर्षाच्या निमित्ताने चाहत्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने लिहिलं की- हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद घेऊन येवो...लव्ह जॉन आणि प्रिया अब्राहम 

8/10

खरंतर जॉनने हे ट्विट चुकून केले होते आणि त्यात त्याने त्याची NRI गर्लफ्रेंड प्रिया रुंचाल हिचं नाव लिहिलं होतं. ट्विट वाचून बिपाशाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर हे नातं संपुष्टात आलं. 

9/10

विशेष म्हणजे यानंतर प्रिया रुंचालशी जॉनने लग्न केलं. वर्ल्ड बँकेत काम करणारी प्रिया आणि जॉनची भेट एका जीममध्ये झाली होती. बिपाशासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याची प्रियासोबतची मैत्री घट्ट झाली होती. जॉनने 2014 मध्ये प्रियाशी खूप गुपचूप लग्न केलं होतं.

10/10

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, प्रिया, बिपाशापूर्वी अजून एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन अब्राहम जेव्हा मॉडेलिंग करायचा तेव्हा त्याची भेट बंगाली ब्यूटी रिया सेनशी झाली. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होतं. जॉनने रियाला लग्नाची मागणी घातली होती. रियाला अभिनय करिअर घडवायचं होतं म्हणून तिने लग्नाला नकार दिला.