Satyajit Tambe News: सत्यजित तांबे प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उच्च शिक्षण घेतलेल्या डिग्रीवरच प्रश्नचिन्ह
सत्यजित तांबे यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीबाबत डॉ अभिषेक हरिदास यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. सत्यजित तांबेचे कोणते प्रतिज्ञापत्र खरे? सत्यजित तांबेची कोणती पदवी खरी? सत्यजित तांबेनी दिली निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिला का असे अनेक प्रश्न डॉ अभिषेक हरिदास यांच्या दाव्यामुळे उपस्थित झाले आहेत.
Maharashtra Politics: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे (Maharashtra Political News). नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ( Nashik Graduate Constituency Election ) निवडणुकीवरुन सुरु असलेल्या वादात मोठा ट्विस्ट आला आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या डिग्रीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित जाले आहे. तांबे यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये बोगस माहितीचा उल्लेख असलयाचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ अभिषेक हरिदास यांनी केला आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सत्यजित तांबे यांचे वडिल सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, यानंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. सज्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीबाबत डॉ अभिषेक हरिदास यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. सत्यजित तांबेचे कोणते प्रतिज्ञापत्र खरे? सत्यजित तांबेची कोणती पदवी खरी? सत्यजित तांबेनी दिली निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिला का असे अनेक प्रश्न डॉ अभिषेक हरिदास यांच्या दाव्यामुळे उपस्थित झाले आहेत.
डॉ अभिषेक हरिदास यांना माहिती अधिकारात काय माहिती मिळाली?
सत्यजित तांबे यांनी सन 2014 साली अहमदनगर शहर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक प्रतिज्ञापत्र भरले होते. तर, सन 2023 मध्ये त्यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, या दोन्ही प्रतिज्ञापत्रात मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा डॉ अभिषेक हरिदास यांनी केला आहे.
जमीन खरेदीचा मुद्दा आणि ने म्युचुअल फंड मधील युनिटचा तपशील लपविल्याचा आरोप
सन 2014 मध्ये सत्यजित तांबे यांनी मौजे पिंपरणे ता संगमनेर येथील स.नं.७२ ही शेतजमीन दि: 4/4/2009 रोजी 4,80,000 रुपयात खरेदी केली होती असे नमूद केले आहे. तर, सन 2019 मध्ये त्यांनी हीच शेतजमीन दि: 4/4/2009 रोजी रोजी 5,12,000 रुपयात खरेदी केली आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे जर सत्यजितने यांनी 2014 च्या प्रतिज्ञापत्रात खरी माहिती दिली असे मानले तर त्यांनी 2019 च्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे समजते असा दावा डॉ अभिषेक हरिदास यांनी केला. सत्यजित तांबे यांनी म्युचुअल फंड मधील युनिटचा तपशील लपविला असल्याचाही दावा केला आहे.
डिग्रीबाबात गोंधळ
सन 2014 मध्ये सत्यजित तांबे यांनी BBA(VMRF),DEC 2005 , MBA(MIT SCHOOL OF MANG PUNE )PUNE UNIVERSITY , BA(POLITICAL SCI )TECNO GLOBAL UNIV , MA(POLITICAL SCI) PUNE UNIVERSITY , 2014 (APP), ECX EDU FOR IMARGING LIDERS (HAWARD UNIVERSITY),2014 अशा सर्व शैक्षणिक गुणवत्ता नमूद केल्या. मात्र, 2019 साली सत्यजित तांबे यांनी तो BBA VMU university , DEC 2005 असे स्पष्ट नमूद केले आहे. मात्र, सत्यजित तांबे यांनी सन 2019 साली BBA वगळता त्याचे इतर शैक्षणिक गुणवत्ता का लपवली असा प्रश्न पडतो. तसेच सत्यजित तांबे यांच्या दोन्ही प्रतिज्ञापत्रात त्याने BBA दोन वेग वेगळ्या विद्यापीठातून झाल्याचे नमूद केले आहे .