मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन असताना DHFL घोटाळ्यातील आरोपी वाधवान आपल्या कुटुंबियांसोबत खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करतात. या घटनेची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. वाधवान कुटुंबियांना शिफारशीचं पत्र दिलेल्या विशेष प्रधानसचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबियांनी प्रवासा करता शिफारशीचं पत्र दिलं. या पत्रामुळे वाधवान कुटुंबियांना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाली असून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. या प्रवासाकरता मिळालेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरस झालं असून यामध्ये त्या २३ जणांचा उल्लेख आहे.  (वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देणारे गुप्ता सक्तीच्या रजेवर)



कोण आहेत ही २३ जण?


JH-05-BP-0021 या गाडीतून DHFL प्रकरणातील मुख्य आरोपी कपिल वाधवान, अरूणा वाधवान, वनिता वाधवान आणि टिना वाधवान यांनी प्रवास केला. 


JH-05-BP-0016 या गाडीतून धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, युविका वाधवान आणि अहान वाधवान यांनी प्रवास केला. (DHFL घोटाळा : वाधवान कुटुंबीय पाचगणीत क्वारंटाइन) 


MH 02 DW 4179 या गाडीतून शत्रुघ्न घागा, मनोज यादव, विनिद शुक्ला, अशोक वाफेळकर आणि दिवान सिंह यांनी प्रवास केला. 


MH 02 DZ 7801 या गाडीतून अमोल मंडळ, लोहीत फर्नाडिंस, जसप्रित सिंह, अरी आणि जस्टीन डमेलो यांनी प्रवास केला. 


MH 02 DG 5473 या गाडीतून इंद्रकांथ चौधरी, प्रदीप कांबळे, एलिझाबेथ अय्यापिल्ली, रमेश शर्मा आणि तारकर सरकार यांनी प्रवास केला. (येस बँक घोटाळा : लॉकडाऊनमध्येही आरोपी वाधवान ब्रदर्स व्हीव्हीआयपी पासने महाबळेश्वरला)



या २३ जणांवर गुन्हा दाखल झाला असून यांना आतो पाचगणीच्या सेंट झेव्हिअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं. खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्यानंतर या २३ जणांना गावकऱ्यांनी अडवलं. गावकऱ्यांनी पोलीस तक्रार केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे.